
महाराष्ट्र विकास सेना पक्षाने लवंग पंचायत समिती गणामध्ये होलार समाजाच्या सुमन जावीर यांना दिली उमेदवारी
प्रतिनिधी
महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून लवंग पंचायत समिती गणामध्ये होलार समाजाच्या सुमन महादेव जावीर यांना उमेदवारी दिली आहे या पंचायत समिती गणामध्ये होलार समाजाचे मताधिक्य मोठ्या प्रमाणावर असून होलार समाज महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवाराच्या पाठीमागे उभे राहिल्यास या ठिकाणी उभे असलेल्या राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाच्या उमेदवार तसेच शिवसेना व तो बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार यांचं गणित बिघडवणार असल्याची चर्चा संपूर्ण लवंग पंचायत समिती गणामध्ये सुरू झाली आहे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून या पंचायत समिती गणामध्ये वेगवेगळी कामे करण्यात आली असून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावरती वेळोवेळी आवाज उठवण्याचे काम करण्यात आले आहे त्याच पद्धतीने या पंचायत समिती गणामध्ये मागासवर्गीय समाजाची लोकसंख्या व मताधिक्य मोठ्या प्रमाणात असून होलार समाजाला उमेदवारी देऊन महाराष्ट्र विकास सेना पक्षाने त्यांचा सन्मान केले असल्याची चर्चा संपूर्ण लवंग पंचायत समिती गणनांमध्ये सुरू आहे त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्ष हे प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे गणित बिघडवणार हे नक्की असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.