
मविसेच्या एन्ट्रीने बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये निवडणूक होणार रंगतदार
प्रतिनिधी :
बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षा कडून महादेव साठे तर बोरगाव पंचायत समितीसाठी अलकाबाई साठे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे.महाराष्ट्र विकास सेवा पक्षाचा बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये मोठ्या प्रमाणात बोलबाला असून त्यांनी बोरगाव आणि माळखांबी गावामध्ये मोठ्या प्रमाणात जनतेचे प्रश्न सोडविले आहेत,मागासवर्गीय समाजाला त्रासदायक ठरणाऱ्या अनेक समस्या त्यांनी सोडविल्या आहेत, बोरगाव जिल्हा परिषद गटाची ज्यांना उमेदवारी दिली आहे ते माळखांबी शाखेचे उपाध्यक्ष आहेत,तसेच बोरगाव पंचायत समितीची उमेदवारी दिलेल्या अलकाबाई साठे या माजी ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांचा आणि त्यांच्या पतींचा मोठा जनसंपर्क आहे.त्यांच्या बोरगाव शाखेचे मार्गदर्शक सुनील साठे आणि माढा विधानसभा संघटक राहुल साठे यांनी प्रयत्न केले.तसेच महादेव साठे यांच्या उमेदवारीसाठी तालुका सरचिटणीस सतीश साठे, विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे, शहराध्यक्ष सागर सरतापे,आणि माळखांबी गावातील सर्वच जनतेने प्रयत्न केले, बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या,बोरगाव,माळखांबी,धानोरे, उघडेवाडी,बोंडले येथे शाखा कार्यरत आहेत,त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या उमेदवारीने बोरगाव जिल्हा परिषद गटातील निवडणुकीत रंगत येणार आहे.