
निवडणूक लढविण्यासाठी सक्षम न ठरणाऱ्या पदाधिकाऱ्यालाघरचा रस्ता दाखवला जाणार- राजेश खरे
प्रतिनिधी : इंदापूर: जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी दिलेल्या माहितीनुसार इंदापूर तालुक्यातील प्रत्येक जिल्हा परिषद गटामध्ये व पंचायत समितीच्या गणांमध्ये उमेदवार देण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.निवडणुका लढविण्याची तयारी पक्षाच्या माध्यमातून केली जाणार आहे. राज्य स्तरावरील व तालुका स्तरावरील जनरल बॉडीच्या पदाधिकारी यांनी स्वतःच्या गटामध्ये उमेदवार उभा करून निवडणूक लढविणे बंधनकारक करण्यात येणार आहे,सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या बरोबर आघाडी करून एक तरी उमेदवार उभा करणे कमप्राप्त आहे.जो जनरल बॉडीमधील तालुका अध्यक्ष व राज्य स्तरावरील पदाधिकारी निवडणूक लढविण्यासाठी सक्षम ठरणार नाही त्याची पक्षातून हकालपट्टी केली जाणार असल्याचे खरे यांनी सांगितले.महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे शाखा अध्यक्ष व इतर पदाधिकारी यांची बैठक घेण्यात येणार असून तशा सूचना लवकरच तालुका अध्यक्ष यांना देण्यात येणार आहेत.निवडणूक लढविणे बंधनकारक करण्यात येणार आहे. ज्यांना जमणार नाही अशा तालुक्याची जबाबदारी असलेल्या जनरल बॉडीमधील पदाधिकारी यांना घरचा रस्ता दाखवला जाणार असल्याचे श्री खरे यांनी सांगितले.