विधानपरिषद निवडणुकीत पंचायत समिती सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार देण्याची मागणी

मविसेचे मुख्यमंत्री फडणवीस व ग्रामविकास विकास मंत्री गोरे यांना निवेदन

प्रतिनिधी:महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी निवेदन दिले आहे.दिलेल्या निवेदनात जिल्हा परिषद व पंचायत समतीवर निवडून आलेल्या जि.प सदस्यांना २० हजार रुपये आणि पं.स सदस्यांना १० हजार रुपये मानधन आणि दैनंदिन भत्ता म्हणून जिल्हा परिषद सदस्य यांना ७०० आणि पंचायत समिती सदस्य यांना ४०० रुपये सुरू करण्याची मागणी केली आहे.महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीवर सदस्य म्हणून निवडून आलेल्या अनेक सदस्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असते.अनेकांना बैठक अथवा सर्वसाधारण सभेला जायचे म्हटले तरी आर्थिक अडचणीचा सामना करावा लागतो.हा प्रश्न लक्षात घेता,राज्य सरकारने जि.प. सदस्यास २० हजार रुपये तर पं.स. सदस्यास प्रतिमहा १० हजार रुपये मानधन आणि दैनंदिन भत्ता म्हणून जिल्हा परिषद सदस्य यांना ७००आणि पंचायत समिती सदस्य यांना ४०० रुपये सुरू करावेत. असे निवेदनात नमूद केले आहे.नगरपंचायत आणि नगरपालिका मधून निवडून आलेले नगरसेवक हे फक्त दोन हजार ते तीन हजार किंवा पाचशे ते एक हजार मतदारांमधून निवडणून येतात, त्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे,मात्र पंचायत समितीचे सदस्य हे दहा ते पंधरा हजार मतदारांमधून निवडून येतात त्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार नाही ही गोष्ट अन्यायकारक आहे,त्यामुळे पंचायत समिती मध्ये निवडून येणाऱ्या सदस्यांना विधानपरिषद निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार देण्यात यावा.आणि त्यांचे मनोबल वाढविण्यात यावे अशी मागणी श्री साठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom