दहिगाव पंचायत समितीसाठी स्नेहल खिलारे यांच्या नावाची संभाव्य उमेदवार म्हणून घोषणा

दहिगाव येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या शाखेचे अनावरण

प्रतिनिधी : नातेपुते: महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते दहिगाव येथील शाखेच्या फलकाचे अनावरण करण्यात आले.काही दिवसांपूर्वी दहिगाव शाखेची कार्यकारणी बरखास्त करण्यात आली होती, त्यानंतर शाखेची पुनर्बांधणी करण्यात आली होती,आणि दिनांक ३१ डिसेंबर रोजी शाखा उभारण्यात आली. यावेळी महाराष्ट्र प्रदेश सचिव अनिल साठे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,सागर होणमाने,ऋतिक नवगिरे,विठ्ठल जावीर, तसेच दहिगाव शाखेतील अध्यक्ष तात्या खिलारे, उपाध्यक्ष नयन खिलारे, कार्याध्यक्ष श्याम बाबर, संघटक सोमनाथ खिलारे, संपर्क प्रमुख ओमकार खिलारे, सह संघटक विशाल बागाव, सरचिटणीस रवि मिसाळ, उप कार्याध्यक्ष बापू पिसाळ, विभाग प्रमुख किरण भिसे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दहिगाव पंचायत समितीच्या निवडणुकीच्या जागेसाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण पडलेले आहे.त्या ठिकाणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या संभाव्य उमेदवार म्हणून दहिगाव येथील स्नेहल खिलारे यांच्या नावाची घोषणा पक्षप्रमुख किरण साठे यांनी केली आहे.जिल्हा परिषद गटाचे उमेदवार यांच्या नावाची घोषणा केलेली असतानाच पंचायत समितीच्या उमेदवाराची घोषणा केल्याने दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये वातावरण तापले आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने धडाधड उमेदवारांची घोषणा करून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत आघाडी घेतली आहे. महाराष्ट्र विकास सेना पक्षाने सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या नेत्यांची डोकेदुखी वाढविण्याचे काम सुरू केले आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाने तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापवायला सुरूवात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom