
संभाव्य उमेदवार म्हणून किसन खिलारे यांच्या नावाची घोषणा
दहिगाव शाखा बरखास्ती नंतर कार्यकारणीची पुनर्बांधणी
प्रतिनिधी : नातेपुते: दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या गावामधील महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक दि २८ रोजी सायंकाळी ७ वाजता मौजे दहिगाव येथील मातंग समाज मंदिर येथे आयोजित करण्यात आली होती.काही दिवसापूर्वी दहिगाव येथील शाखेची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली होती.त्यानंतर ही पहिलीच बैठक दहिगाव येथे घेण्यात आली.सदर बैठकीला पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे,तालुका संघटक अविनाश गायकवाड,पिरळे गावचे शहराध्यक्ष राहुल खिलारे मोराची येथील आप्पा खिलारे,संपत खिलारे,एकशिव येथील सचिन अवघडे,शंकर अवघडे उपस्थित होते.




शाखा बरखास्ती नंतर पहिलीच बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली,यावेळी नूतन शाखा कार्यकारणी जाहीर करण्यात आली आहे.त्यामध्ये दहिगाव शहर मार्गदर्शक पदी किसन खिलारे,शहर शाखा अध्यक्ष पदी तात्या खिलारे, उपाध्यक्षपदी,नयन खिलारे, संघटकपदी सोमनाथ खिलारे, कार्याध्यक्षपदी श्यामराव बाबर, संपर्क प्रमुख पदी ओमकार खिलारे, सहसंघटक पदी विशाल बागाव, सरचिटणीस पदी रविंद्र मिसाळ, विभाग प्रमुख पदी किरण भिसे,उप कार्याध्यक्षपदी बापू पिसाळ,तर प्रशांत खिलारे,रमेश जाधव, शिवाजी खिलारे,गणेश खिलारे, महादेव खिलारे,प्रदीप खिलारे, विकास खिलारे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये संभाव्य उमेदवार म्हणून दहिगाव येथील किसन खिलारे यांच्या नावाची घोषणा पक्षप्रमुख किरण साठे यांनी केली.तसेच या जिल्हा परिषद गटामध्ये असलेल्या एक जिल्हा परिषद व दोन पंचायत समितीच्या जागा लढविण्यात येणार असल्याचे प्रदेश संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी स्पष्ट केले.दहिगाव जिल्हा परिषद गटामध्ये पक्षाकडून एकशिव,मोराची गावातून अनेक उमेदवार इच्छुक असल्याची माहिती श्री कांबळे यांनी दिली.तालुक्यातील प्रमुख पक्षांनी अजून निवडणुकीची तयारी सुरु केली नसताना महाराष्ट्र विकास सेना पक्षाने संभाव्य उमेदवार जाहीर करून खळबळ उडवून दिली आहे. त्यामुळे सत्ताधारी पार्टी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष व भाजप यांच्या भूमिकेकडे तालुक्याचे लक्ष लागून राहिले आहे.









