
अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मविसेची आढावा बैठक :
निवडणुकीची जोरदार तयारी एकूण ६ प्रभागामध्ये २४ जण इच्छुक : रस्सीखेच वाढणार !
प्रतिनिधी: अकलूज नगर परिषद निवडणुकीच्या संदर्भात महाराष्ट्र विकास सेना पक्षामध्ये काम करणाऱ्या अकलूज शहरांमधील सर्व शाखाध्यक्ष,शहरामध्ये कार्यरत असलेले सर्व प्रमुख पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांची आढावा बैठक महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अकलूज येथील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे नगर येथील त्यांच्या निवासस्थानी पार पडली.बैठकीमध्ये अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचा आढावा घेण्यात आला 13 प्रभागापैकी किती प्रभागांमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष स्वतंत्र निवडणूक लढवू शकतो याचा आढावा पक्षप्रमुख किरण साठे यांनी घेतला,त्यापैकी सदर बैठकीमध्ये महाराष्ट्र विकास सेना पक्ष निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले.त्यामुळे कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले,एकूण 13 प्रभागापैकी सहा प्रभागांमध्ये 24 इच्छुक उमेदवारांनी निवडणूक लढवण्यासाठी आपली नावे पक्षाकडे दिली आहेत,त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्ष येणाऱ्या अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत.त्यामध्ये भर म्हणून या बैठकीमध्ये इच्छुक असलेल्या उमेदवारांच्या संख्या वरून महाराष्ट्र विकास सेना पक्षामध्ये उमेदवारीसाठी रस्सीखेच होणार असल्याचे दिसून येत आहे. सद्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नाला हात घालत जात आहे. त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या बाबतीत अकलूज नगरपरिषद कार्यक्षेत्रात सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे पाहायला मिळाले आहे.अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून महाविकास आघाडी व महायुती या सर्व पक्षाकडून जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे, सध्या प्रभाग क्रमांक ९ मध्ये राहत राहत असलेल्या महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या पत्नी सुवर्णा साठे यांचे नाव अकलूज नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी चर्चेत आले आहे.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने निवडणूक लढविण्यासाठी घोषणा करण्यात आली आहे, त्यामुळे त्यांचा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार उभा केला जाणार आहे, मविसे पक्षाने तयारी सुरू केली आहे,१३ प्रभागापैकी ६ प्रभागातील इच्छुक उमेदवारांची पडताळणी केली आहे.