बोरगाव जिल्हा परिषदची निवडणूक मविसे लढविणार ?

बोरगाव जिल्हा परिषदची निवडणूक मविसे लढविणार ?

बिभीषण साठे,सतीश साठे,सागर सरतापे संभाव्य उमेदवार !

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या माध्यमातून माळशिरस तालुक्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लढवण्याची घोषणा नुकत्याच अकलूज मध्ये पार पडलेल्या आढावा बैठकीमध्ये पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे,सदर बैठकीमध्ये पक्षप्रमुख किरण साठे यांनी प्रत्येक जिल्हा परिषद गटांमध्ये इच्छुक उमेदवारांचा आढावा घेण्यासाठी सूचना केल्या होत्या,त्यामध्ये सर्वप्रथम महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी त्यांनी आदेश दिले होते, त्यानुसार माळखंबी गावातील माढा विधानसभा अध्यक्ष बिभीशन साठे, माळशिरस तालुका सरचिटणीस सतीश साठे,माळखांबी शहराध्यक्ष सागर सरतापे या तिन्ही पदाधिकाऱ्यांची नावे बोरगाव जिल्हा परिषद गटासाठी चर्चेत आली आहेत ते पक्षाचे संभाव्य उमेदवार असू शकतात अशी चर्चा सुरू झाली आहे.मात्र तिन्ही पैकी एकालाच या जागेवर निवडणूक लढविता येणार आहे.बोरगाव जिल्हा परिषद गटाच्या निवडणुकीमध्ये माळखांबी गावाची भूमिका अतिशय महत्त्वाची ठरणार असून महाराष्ट्र विकास सेना पक्षाने बोरगाव जिल्हा परिषद गटामध्ये चांगल्या प्रकारे कार्यकर्त्यांचे जाळे निर्माण केले आहे,त्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्ष बोरगाव जिल्हा परिषद गटांमध्ये निवडणुकीसाठी उतरल्यास त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.बोरगाव जिल्हा परिषद गट अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने या जिल्हा परिषद गटामध्ये सत्ताधारी पक्ष विरोधी पक्ष या दोन्ही पक्षाचे उमेदवार उभा राहणार असून त्यांच्यामध्येही उमेदवारासाठी रस्सीखेच लागणार आहे मात्र महाराष्ट्र विकास सेना पक्षाने स्वतःच्या पक्षातील पदाधिकारी यांना प्रथम प्राधान्य द्यायचे ठरवल्यामुळे महाराष्ट्र विकास सेना पक्ष स्वतंत्र निवडणूक लढणार का ? किंवा सत्ताधारी की विरोधक या दोघांपैकी कुणाबरोबर जाणार ? याची उत्सुकता लागून राहिली आहे.मात्र महाराष्ट्र विकास सेना पक्षाने निवडणुकीत उतरण्याचे ठरवल्यास इतर पक्षांची डोकेदुखी वाढणार हे मात्र निश्चित आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom