
अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा स्तुत्य उपक्रम
प्रकाश बापू पाटील यांच्या हस्ते पाणीव येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये विद्यार्थ्यांना वह्या
प्रतिनिधी : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये माळशिरस तालुक्यात १०,००० वह्या वाटप करण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे,त्याच अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या पानीव शाखेच्या वतीने पानीव येथील माळशिरस जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम पार पडला,सदर कार्यक्रमाला काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, आझाद चौक शाखा अध्यक्ष किरण खंडागळे, पानीव शाखेचे मार्गदर्शक मधुकर साठे उपस्थित होते.तसेच शाळेतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.