इस्लामपूर व माळशिरस येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये वह्या वाटप

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विकास सेना पक्षाचा स्तुत्य उपक्रम
प्रतिनिधी : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र विकास सेना पक्षप्रमुख किरण साहेब साठे यांच्या मार्गदर्शनाखाली माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेमध्ये माळशिरस तालुक्यात १०,००० वह्या वाटप करण्याचा संकल्प पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे, माळशिरस ६०फाटा जिल्हा परिषद केंद्रीय शाळा व इस्लामपूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा,येथील विद्यार्थ्यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने वह्या वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला, सदर कार्यक्रम महाराष्ट्र विकास युवासेना माळशिरस तालुका उपाध्यक्ष दीपक (भाऊ )कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी कण्हेरचे युवा नेते आप्पासाहेब लोखंडे,कनेर शहराध्यक्ष अरुण मिसाळ,अण्णा होनमाने इस्लामपूर शाखेचे मार्गदर्शक विकास कांबळे, माळशिरस कार्याध्यक्ष सुरज कांबळे,अतिश कांबळे,सागर होणमाने,अभय मदने जय कांबळे ,व महाराष्ट्र विकास सेनेचे इतर कार्यकर्ते उपस्थित होते.