खंडाळी ग्रामपंचायतने केला दारू धंदे बंदीचा ठराव मंजूर

खंडाळी ग्रामपंचायतने केला दारू धंदे बंदीचा ठराव मंजूर

खंडाळी ग्रामपंचायतवरती निघणारा मविसेचा मोर्चा रद्द

प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावातील ग्रामस्थांच्या व महिलांच्या वतीने महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडे गावातील बेकायदेशीर व अवैद्यरित्या सुरू असलेले दारूचे धंदे बंद करण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी मौजे खंडाळी तालुका माळशिरस या ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तात्काळ बेकायदेशीर व अवैधरित्या विक्री करून सुरू असलेले दारूचे धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली होती,हे बेकायदेशीर दारू धंदे सुरू असल्याने गावातील शांतता भंग झाली असून कष्टकरी महिलांना त्यांच्या पती कडून दारू पिऊन आल्यानंतर नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे निवेदनात म्हटले आहे.दारू बंदीचा ठराव ग्रामपंचायतने तात्काळ मंजूर करावा अशी मागणी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने करण्यात आली होती आणि ठराव मंजूर न केल्यास खंडाळी ग्रामपंचायतवरती ३० जून रोजी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिला होता त्यानुसार ग्रामपंचायतने दिनांक २५ जून रोजी महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या मागणीनुसार दारू धंदे बंदीचा ठराव मंजूर करण्यात आला आहे,त्यामुळे ३० जून चा मोर्चा रद्द करण्यात आला असल्याचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom