खंडाळी गावात दारू बंदीचा ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी मविसेचा ३० जूनला मोर्चा

खंडाळी गावात दारू बंदीचा ठराव मंजूर करण्याच्या मागणीसाठी मविसेचा ३० जूनला मोर्चा

प्रतिनिधी : माळशिरस तालुक्यातील खंडाळी गावातील ग्रामस्थांच्या व महिलांच्या वतीने महाराष्ट्र विकास सेना पक्षाकडे गावातील बेकायदेशीर व अवैद्यरित्या सुरू असलेले दारूचे धंदे बंद करण्यात यावे यासाठी प्रयत्न करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी मौजे खंडाळी तालुका माळशिरस या ग्रामपंचायतीला निवेदन देऊन तात्काळ बेकायदेशीर व अवैधरित्या विक्री करून सुरू असलेले दारूचे धंदे बंद करण्याचा ठराव मंजूर करण्यात यावा अशी मागणी केली आहे हे बेकायदेशीर दारू धंदे सुरू असल्याने गावातील शांतता भंग झाली असून कष्टकरी महिलांना त्यांच्या पती कडून दारू पिऊन आल्यानंतर नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे निवेदनात म्हटले आहे.दारू बंदीचा ठराव ग्रामपंचायतने तात्काळ मंजूर न केल्यास खंडाळी गावच्या ग्रामपंचायत वरती ३० जून रोजी मोर्चा काढण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom