आ.जानकर यांच्या निवासस्थानी जाणारा मोर्चा खंडाळीत प्रशासनाने रोखला

आ.जानकर यांच्या निवासस्थानी जाणारा मोर्चा खंडाळीत प्रशासनाने रोखला

कारवाई केल्याचे व करण्याचे पोलिस प्रशासनाने दिले आश्वासन

अवैध दारू धंदे बंद करण्याच्या मागणीसाठी मविसेचा पदयात्रा व मोर्चा

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांची मात्र मोर्चाला दांडी

प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने माळशिरस तालुक्यातील अवैध दारू धंदे बंद करण्यात यावेत या मागणीसाठी अकलूज येथील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर हलगी मोर्चा काढण्यात आला,मात्र अवैध दारू विक्री सुरू असल्याचे दिसून आले त्यामुळे बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले.धंदे बंद न केल्यास माळशिरसचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात येणार असल्याचे पक्षप्रमुख किरण साठे यांनी जाहीर केले होते तरीही तालुक्यातील अवैध दारू धंदे चालू आहेत आणि आंदोलनाचा ९ वा दिवस असल्याने महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पदाधिकारी यांनी आक्रमक भूमिका घेत आमदार उत्तमराव जानकर यांच्या निवासस्थानी जाण्यासाठी पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश सचिव अनिल साठे व संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली १७ जून रोजी अकलूज येथून वेळापूर ला जाण्यासाठी पदयात्रा काढण्यात सुरू करण्यात आली,मात्र पोलिस प्रशासनाच्या विनंतीला मान देवून आणि त्यांनी लेखी दिलेल्या आश्वासनामुळे मौजे खंडाळी येथे पदयात्रा व मोर्चा थांबविण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी कोणत्याही प्रकारची ठोस कारवाई केली नसल्याने त्यांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला.मोर्चात महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता.उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या आदेशानुसार अकलूज पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जी.बी.चौधरी व आकाश शेळके केलेल्या कारवाईचा अहवाल व पुढील कारवाई करण्याचे लेखी पत्र दिले.यावेळी प्रदेश सचिव अनिल साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,तालुका अध्यक्ष बापुसाहेब वाघमारे,माढा विधानसभा अध्यक्ष बिभीषण साठे, तालुका सरचिटणीस सतीश साठे, युवा सेना जिल्हा संघटक साईराज अडगळे, युवा सेना माळशिरस तालुका अध्यक्ष आदित्य काकडे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. खंडाळी येथे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे ज्येष्ठ नेते आत्माराम खंडागळे,युवा नेते विजय खंडागळे, नागेश खंडागळे यांनी स्वागत केले.

आमदार उत्तमराव जानकर यांनी आमसभेत तालुक्यात कोणत्याही गावात दारू विक्री केली जाणार नाही असे प्रशासनाला सांगितले होते मात्र,त्यांच्या सूचनेनंतर तालुक्यातील फक्त पोलीस प्रशासनच धाडी टाकून कारवाई करण्यात अग्रेसर आहे असे दिसत आहे.आमदार उत्तमराव जानकर यांच्या सूचनेला राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी गंभीरपणे घेतले नाही.त्यामुळे मोर्चात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी हिवाळी अधिवेशनात आवाज उठवण्याची मागणी करण्यात आली.उत्तम जानकर यांच्या निवासस्थानी जाण्यापासून प्रशासनाने पदयात्रा खंडाळीतच रोखली.त्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली. मात्र माळशिरस तालुक्यातील अवैध दारू धंदे बंद करण्यात येत नाहीत तोपर्यंतच आंदोलन सुरू असल्याचे प्रदेश सचिव अनिल साठे आणि संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom