आमदार उत्तमराव जानकर यांच्या घरावर पदयात्रा काढून १७ जून रोजी मोर्चा
माळशिरस आणि नातेपुते पोलीस स्टेशनच्या विरोधात अकलूजमधे विराट मोर्चा
पाचव्या दिवशीही बेमुदत धरणे आंदोलन सुरूच…
प्रतिनिधी: माळशिरस आणि नातेपुते पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू शिंदी ताडी विक्री निर्मिती करणाऱ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी आणि सर्व अवैद्य धंदे कायमचे बंद करण्याच्या मागणीसाठी अकलूज येथील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिनांक ९ जून रोजी हलगी मोर्चा काढण्यात आला.मात्र नातेपुते व माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू शिंदी,ताडी,विक्री करणाऱ्यावर कारवाई करून धंदे बंद न केल्याने साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. आंदोलनाच्या पाचव्या दिवशी ही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले आहे.जोपर्यंत अवैद्य धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे प्रदेश सचिव अनिल साठे व संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.तसेच महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत आमदार उत्तमराव जानकर यांच्या घरावर दिनांक १७ जून रोजी अकलूज ते वेळापूर पदयात्रा काढून हलगी मोर्चा काढण्यात येणार आहे,तसेच धंदे बंद न केल्यास त्याच्या घरासमोर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर १७ जून पासूनच बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.तसेच माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पिलीव गावात दारू बंदीचा ठराव मंजूर करून सुद्धा धंदे सुरूच ठेवण्यात आले आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई करून धंदे बंद न केल्यास माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्याची मागणी पोलिस महासंचालक व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे मविसेचे प्रदेश सचिव अनिल साठे यांनी सांगितले.