
अकलूज पोलीस स्टेशनच्या विरोधात अकलूजमधे विराट मोर्चा
चौथ्या दिवशीही बेमुदत धरणे आंदोलन सुरूच…
१६ जून रोजी मंत्रालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन
प्रतिनिधी: अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू शिंदी ताडी विक्री निर्मिती करणाऱ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी आणि सर्व अवैद्य धंदे कायमचे बंद करण्याच्या मागणीसाठी अकलूज येथील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने दिनांक ९ जून रोजी हलगी मोर्चा काढण्यात आला.मात्र अकलूज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील अवैध दारू शिंदी,ताडी,विक्री करणाऱ्यावर कारवाई करून धंदे बंद न केल्याने साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू करण्यात आले. जोपर्यंत अवैद्य धंदे बंद होत नाहीत तोपर्यंत बेमुदत धरणे आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे प्रदेश सचिव अनिल साठे व संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.तसेच मंत्रालयासमोर ही १६ जून पासून बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.