
मविसेच्या कण्हेर येथील आंदोलनाला मिळाले यश
गटविकास अधिकारी यांचा आदेश तर ग्रामपंचायतचे लेखी आश्वासन
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख उपस्थितीत आणि संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कण्हेर तालुका माळशिरस येथील गट नंबर २९१ मधील ग्रामस्थांच्या ग्रामपंचायत दप्तरी भोगवटदार सदरी नोंद करण्याच्या मागणीसाठी अकलूज येथील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक ९ जून रोजी विराट हलगी मोर्चा काढण्यात आला,या मोर्चाच्या दिवशी गटविकास अधिकारी माळशिरस यांनी लेखी पत्र न दिल्यामुळे त्याच दिवशी अकलूजमधील साहित्यरत्न डॉ अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुदत धरणे आंदोलन आणि दिनांक १० जून रोजी कन्हेर गावामध्ये बेमुदत धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली.सदर आंदोलन दोन दिवस करण्यात आले.यावेळी पक्षप्रमुख किरण साठे,संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे,माळशिरस तालुका अध्यक्ष बापुसाहेब वाघमारे, नितीन मिसाळ,कण्हेर शाखा अध्यक्ष सागर मिसाळ,आप्पा लोखंडे,गोरख लोखंडे,शंकर जाधव,आप्पा बोडरे, सागर होणामणे,विलास बुधवाले पिंटू मदने, रावसाहेब मदने,बाळू मदने,मनोज काशिद,पप्पू मिसाळ पांडुरंग मिसाळ,अरुण मिसाळ उपस्थित होते.
आंदोलनाच्या दिवशी (दिनांक १० जून रोजी )गटविकास अधिकारी माळशिरस यांनी कण्हेर ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत अधिकारी यांना लेखी पत्र देऊन कण्हेर गावातील ग्रामस्थांना गट नंबर २९१ मध्ये शासनाच्या मालकीच्या खुल्या जागेत प्रधानमंत्री आवास घरकुल योजना व महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा पात्र लाभार्थी यांना लाभ देण्यासाठी जे लाभार्थी भूमिहीन आहेत अशा लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे शासनाकडील जागा मिळणे करिता प्रस्ताव ग्रामपंचायत मार्फत सादर करावा,सदर प्रस्ताव तयार करणेबाबतची अंमलबजावणी तात्काळ करणेत यावी.आणि आंदोलनकर्ते यांना ग्रामपंचायत मार्फत योग्य ती कार्यवाही करून आंदोलनापासून परावृत करावे असे निर्देश दिले.गटविकास अधिकारी यांच्या निर्देशानुसार ग्रामपंचायत अधिकारी श्री हनुमंत वगरे यांनी कण्हेर गावातील रहिवासी असलेल्या ग्रामस्थांना गट नंबर २९१ मध्ये शासनाच्या मालकीच्या खुल्या जागेत प्रधानमंत्री आवास योजना व महाराष्ट्र शासनाच्या घरकुल योजनेचा पात्र लाभार्थी यांना लाभ देणे करिता जे लाभार्थी भूमिहीन आहेत अशा लाभार्थ्यांना नियमाप्रमाणे शासनाकडील जागा मिळणे करिता प्रस्ताव ग्रामपंचायतकडे मागणी अर्जातील १ ते ३७ व इतर भूमिहीन ग्रामस्थ यांनी या कार्यालयाकडे भूमिहीन दाखला जोडून जागा व घरकुल मागणी अर्ज दिनांक ३० जून २०२५ पर्यंत कार्यालयाकडे सादर करावेत आणि चालू असलेले बेमुदत धरणे आंदोलन थांबवावे विहित मुदतीत मागणी अर्ज सादर केल्यास त्वरित वरिष्ठ कार्यालयाकडे घरकुल बांधकामासाठी जागा मिळणे कामी पाठपुरावा केला जाईल.असे लेखी आश्वासन दिल्याने त्यांच्या विनंतीस मान देवून पक्षप्रमुख किरण साठे यांच्या उपस्थितीत धरणे आंदोलनाची सांगता करण्यात आली.महाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या आंदोलनामुळे कण्हेर गावातील ग्रामस्थांना योग्य दिशा मिळाली असून पक्षाच्या आंदोलनाला यश मिळाले असल्याचे संपर्क प्रमुख बाळासाहेब कांबळे यांनी सांगितले.