
पोलिस प्रशासन व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विरोधात अकलूजमधे बेमुदत ठिय्या आंदोलनाचा दुसरा दिवस
माळशिरस तालुक्यातील, खंडाळी,निमगाव,बोरगाव,म्हाळुंग, जांबुड,पिलीव गावातील महिलांचा पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांवर केला आरोप
प्रतिनिधी : हाराष्ट्र विकास सेना पक्षाच्या वतीने पक्षप्रमुख किरण साठे यांच्या प्रमुख उपस्थितीत व प्रदेश सचिव अनिल साठे यांच्या नेतृत्वाखाली अकलूज मध्ये माळशिरस तालुक्यातील अवैध दारू,ताडी,शिंदि चे धंदे बंद करण्यात यावेत आणि विक्री करणाऱ्यावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी यासाठी विराट हलगी मोर्चा काढण्यात आला.धंदे बंद करण्यात आले नसल्याने तात्काळ साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ यांच्या स्मारकासमोर बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. धंदे बंद करण्यात येत नाहीत तोपर्यंतच आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे साठे यांनी सांगितले.माळशिरस तालुक्यातील, खंडाळी,निमगाव,बोरगाव,म्हाळुंग, जांबुड,पिलीव तसेच अकलूज,वेळापूर, नातेपुते,माळशिरस पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आणि राज्य व हद्दीतील अवैध दारू, शिंदी,ताडीचे धंदे कायमचे बंद करण्यात यावेत आणि विक्री करणाऱ्यावर आणि मूळ मालकावर तडीपारीची कारवाई करण्यात यावी.या मागणीसाठी अकलूजमधील साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर दिनांक ९ जून रोजी भव्य हलगी मोर्चा काढण्यात आला. मात्र राज्य उत्पादन शुल्क विभाग व पोलिस प्रशासनाने अवैध दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करून धंदे बंद केले नाहीत त्यामुळे साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर बेमुद धरणे/ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे, आजचा दुसरा दिवस आहे. मोर्चामध्ये सहभागी झालेल्या महिलांनी पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी हे अवैध दारू विक्री करणाऱ्याना पाठीशी घालत असल्याचा आरोप केला आहे.