
मविसे पक्षाचे उद्या अकलूजमधे विविध मागण्यासाठी महा धरणे आंदोलन
माळशिरस तालुक्यातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन
प्रतिनिधी : महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे पक्षप्रमुख किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील विविध मागण्यासाठी अकलूजमधे साहित्यरत्न डॉ आण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकासमोर हलगीनाद व महा धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता २१०० रुपये करण्यात यावा, शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करण्यात यावे, हिंदी भाषेची सक्ती रद्द करण्यात आली आहे असा शासन निर्णय करण्यात यावा.भूविकास बँकेने शेतकऱ्यांना दिलेले कर्ज माफ करण्यात यावे.सामाजिक न्याय मंत्रालयाचा राखीव निधी इतर विभागात वर्ग करण्यात येऊ नये.तालुक्यातील अवैध दारू धंदे बंद करण्यात यावेत.उंबरे वेळापूर येथील मागासवर्गीय महिलेला मारहाण करण्यात आल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच विविध मागण्यासाठी हलगीनाद व महा धरणे आंदोलन आयोजित करण्यात आले आहे.तालुक्यातील जनतेने सहभागी होण्याचे आवाहन प्रदेश सचिव अनिल साठे यांनी केले आहे.