सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

सोलापूर जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

माळशिरस तालुक्यातील ग्रामीण पेयजल योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशीची मागणी

प्रतिनिधी : सोलापूर : ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे सोलापूर जिल्ह्याचे कार्यकारी अभियंता यांना महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे नेते दत्ता कर्चे यांनी निवेदन सादर केले आहे, निवेदनामध्ये गुरसाळे ता. माळशिरस येथील राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतील पाण्याच्या टाकीच्या निकृष्ट दर्जाच्या कामाबाबत आणि त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील पिरळे,तांबवे,रेडे,नेवरे,खंडाळी,लवंग या गावातील करण्यात आलेल्या ग्रामीण पेयजल योजनेच्या निकृष्ट दर्जाच्या कामाची चौकशी करावी अशी मागणी करून १९ सप्टेंबरला सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर तीव्र स्वरूपात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.

राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेतून गुरसाळे माळशिरस येथील झालेल्या पाण्याच्या टाकीचे अत्यंत निकृष्ट दर्जाचे काम करून शासनाचा लाखो रुपयाचा निधी पाण्यामध्ये घालवण्याचे काम सदर ठेकेदार व संबंधित अभियंते यांनी केल्याचे दिसून आलेले आहे सन 2019/ 20 यासाठी राष्ट्रीय पेयजल योजनेतून मंजूर झालेले काम सन 2022 ला पूर्ण करून सदर टाकी नागरिकांसाठी पाणी वाटपाला खुली करण्यात आली सदर पाण्याच्या टाकीमध्ये तळ्यातून पाणी सोडले असता ती टाकी संपूर्ण निकृष्ट दर्जाची झाल्याने सर्वच बाजूने गळत असल्याचे दिसून येते एक ते दीड वर्षांमध्येच सदर टाकी गळत असल्याने व धोकादायक पद्धतीने उभा असल्याने सदर निधीचा मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचा दिसून येत आहे असे महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे नेते दत्ता कर्चे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

संबंधित कामाचा ठेकेदार हा अनुभवी नसल्याचे टाकीकडे पाहून दिसून येते कारण सदर टाकीचे इस्टिमेट नुसार काम न झाल्यामुळे व आपल्या विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळेच लाखो रुपयाचा चुराडा करूनही गावातील नागरिकांना या टाकीचा उपयोग काहीच नाही अशी परिस्थिती गावातील नागरिकांचे म्हणणे येते सदर काम पाहणारे आपल्या विभागाचे अधिकारी असे निकृष्ट काम करण्यात सहभागी असल्याचे दिसून येते सदर टाकी मुळे मोठा अपघातही होण्याची भीती आहे त्या टाकीच्या शेजारीच स्मशानभूमी तसेच एक वस्ती रस्ताही आहे त्या टाकीच्या भोवती गुरेराखी व मेंढपाळ शेळी पालक मोठ्या प्रमाणात दिसून येतात त्यामुळे सदर टाकी ही अत्यंत धोकादायक आहे या टाकीच्या कामांमध्ये लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्यामुळेच सदर काम निकृष्ट झालेले दिसून येते तरी सदर टाकीची व पाईपलाईनचे आणि माळशिरस तालुक्यातील पिरळे,तांबवे,रेडे,नेवरे,खंडाळी,लवंग येथील करण्यात आलेल्या ग्रामीण पेयजल योजनेच्या सर्वच निकृष्ट दर्जाच्या कामाची उच्चस्तरीय चौकशी राज्य गुणवत्ता नियंत्रण विभागामार्फत करण्यात यावी अन्यथा आपल्या कार्यालयाच्या विरोधात बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र विकास सेना पक्षाचे नेते दत्ता कर्चे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom