प्रतापसिंह चौक येथे झाला अपघाती मृत्यू !

प्रतापसिंह चौक येथे झाला अपघाती मृत्यू !

किरण साठेंची बांधकाम विभागाकडे स्पीड ब्रेकर करण्याची मागणी

प्रतिनिधी : : बहुजन ब्रिगेडच्या वतीने अकलूजमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनीता पाटील यांना किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले.निवेदनात अकलूजमधील प्रतापसिंह चौक येथे तात्काळ स्पीड ब्रेकर बनविण्याची मागणी करण्यात आली.यावेळी किरण साठे,रफिक सय्यद,बंडू कांबळे,रफिक मुलाणी,मोनू ननावरे उपस्थित होते.

आपल्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या अकलूजमधील प्रतापसिंह चौक येथे नुकताच अपघात होवून एका व्यक्तीला स्वतःचा जीव गमवावा लागला असून रस्त्यावर स्पीड ब्रेकर नसल्याने वाहनांचा वेग खूप जास्त असतो त्यामुळे या चौकातून जाणाऱ्या चारही बाजूच्या रस्त्यावर रोजच अपघात होत आहेत त्याचाच प्रत्यत आता आला असून वाहनांच्या स्पीड मुळे एकाला स्वतःच्या जीवाला मुकावे लागले आहे.असे निवेदनात म्हटले आहे.

प्रतापसिंह चौकातून जाणाऱ्या अकलूज ते वेळापूर,प्रतापसिंह चौक ते धवलनगर,प्रतापसिंह चौक ते नवीन एसटी स्टँड दोन्ही बाजूचे रस्ते,प्रतापसिंह चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक या रस्त्यावर तात्काळ स्पीड ब्रेकर करण्यात यावेत अशी मागणी बहुजन ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom