यशवंतनगर ते क्रीडा संकुल पर्यंत चे अतिक्रमण काढण्याची मागणी
२२ ला फलटण येथील नीरा उजवा कालव्यासमोर आंदोलन
प्रतिनिधी : माळशिरस : वितरिका क्रमांक ९ दारे क्रमांक अकलूज ते मायनर टेल या फाट्यावरती यशवंत नगर मधील मारुतीचे मंदिर ते उदयकीर्ती स्टील दुकान च्या पाठीमागून अकलूजमधील क्रीडा संकुल इथपर्यंत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यात आले आहे ते अतिक्रमण करणाऱ्या धारकांवर कारवाई करून अतिक्रमण काढण्याची मागणी बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे यांनी नीरा उजवा कालवा फलटणचे कार्यकारी अभियंता संजय बोडखे यांना निवेदन दिले आहे.सदर निवेदन उप अभियंता मिलिंद सपकाळ यांनी स्वीकारले.
यशवंत नगर ते अकलूजमधील क्रीडा संकुल पर्यंत केलेले अतिक्रमण हे पाटबंधारे विभागाच्या नाकावरती टिचून करण्यात आल्याचे दिसून येत असल्याचे किरण साठे यांनी निवेदनात म्हटले आहे.मारुती मंदिरापासून ते उदय कीर्ती स्टील दुकानाच्या पाठीमागून क्रीडा संकुल च्या समोर पर्यंत केलेले सर्व अतिक्रमण काढून अतिक्रमण धारक यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करावा आणि अतिक्रमण केलेले असताना डोळेझाक करणाऱ्या संबंधित शाखा अभियंता यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याच्या मागणीसाठी २२ तारखेला कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा येथे आंदोलन करण्याचा इशारा किरण साठेंनी दिला आहे.
