१९ एप्रिलचा शिक्षण विभागाचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी

१९ एप्रिलचा शिक्षण विभागाचा शासन निर्णय त्वरित रद्द करण्याची मागणी

राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन ब्रिगेडचा आंदोलनाचा इशारा.

प्रतिनिधी : लवंग :
महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि
शालेय शिक्षण मंत्री यांना माळशिरस तालुक्याचे तहसीलदार यांच्यामार्फत राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण यांनी निवेदन पाठवून शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या कार्यालयाने १९ एप्रिल २०२३ रोजी काढलेला शासन निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे.निवेदन माळशिरस तालुक्याचे तहसीलदार तुषार देशमुख यांनी निवेदन स्वीकारले.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष अँड.धैर्यशील पाटील,बहुजन ब्रिगेडचे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,राष्ट्रवादी काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवक तालुका उपाध्यक्ष जाकीर शेख,बापू वाघमारे,रुक्मिणी रणदिवे,कावड अध्यक्ष नवनाथ खंडागळे, सोमनाथ लोखंडे,बहुजन ब्रिगेडचे अकलूज शहराध्यक्ष आनंद मिसाळ,सचिन खंडागळे,तुकाराम देशमाने उपस्थित होते.

महाराष्ट्र शासनाच्या राज्य अभ्यासक्रमाच्या शाळा वगळून राज्यातील इतर परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये सन २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षापर्यंत इयत्ता आठवी,नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांचे मराठी विषयाचे मूल्यांकन करताना श्रेणी स्वरूपात अ ब क ड केले जावे तसेच सदर मूल्यांकनाचा समावेश या परीक्षा मंडळाच्या इतर विषयाच्या एकत्रित मूल्यांकनामध्ये करण्यात येऊ नये शासन निर्णय दिनांक १ जून २०२० मधील परिशिष्ट ‘ब’ नुसार श्रेणी निश्चित व मूल्यांकन बाबत वरील निर्णयानुसार योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी संबंधित परीक्षा मंडळ व्यवस्थापनाची राहील असा शासन निर्णय १९ एप्रिल २०२३ रोजी महाराष्ट्र राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने काढला आहे.

मराठी भाषेचा सन्मान राखणे, मराठी भाषेचा अधिकाधिक वापर करणे आणि मराठीचा प्रसार करणे ह्यासाठी महाराष्ट्र सरकार कटिबध्द असलं पाहिजे. किंबहुना जेंव्हा भाषावार प्रांतरचना झाली तेंव्हा महाराष्ट्र सरकारवर आलेली, राज्यघटनेनं दिलेली ही एक महत्वाची जबाबदारी आहे.महाराष्ट्र शासनानं स्वतः:ची ही जबाबदारी पार पाडावी आणि नवा मराठीविरोधी आदेश त्वरित मागे घ्यावा.अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस आणि बहुजन ब्रिगेडच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा किरण साठे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom