राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुळे यांच्याकडे साठेंचा कार्य अहवाल सादर
किरण साठेंचे सुप्रिया सुळे यांनी केले कौतुक
प्रतिनिधी : : राष्ट्रवादी काँग्रेसच्या बारामती मतदारसंघाच्या संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे इंदापूर तालुक्यातील गाव भेट दौऱ्यावर असताना तालुक्यातील जांब या गावांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी त्यांची भेट घेवून जिल्हा सरचिटणीस पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून केलेल्या कामाचा अहवाल सादर केला.यावेळी सोलापूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे उपस्थित होते.
माळशिरस तालुक्यातील सत्ताधारी यांच्या विरोधामध्ये कणखरपणे उभा राहून सन्माननीय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य जनतेमध्ये पोहचविण्यासाठी आणि सत्ताधाऱ्यांना परखडपणे प्रत्युत्तर देण्याचं किरण साठे नेहमीच काम करीत असल्याचे दिसून आले,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची अतिशय सडतोडपणे भूमिका मांडण्याचे काम सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे नेहमीच करताना दिसतात. किरण साठे यांनी जिल्हा सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारल्यापासून पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेच्या सोडवलेल्याअडचणी,अधिकार्यांच्या बाबतीत असलेले प्रश्न सोडवणे प्रश्न,महागाई विरोधात केलेली आंदोलने महिलांचे प्रश्न त्याच पद्धतीने सर्व सामान्य जनतेला पक्षाच्या माध्यमातून मिळवून दिलेला न्याय आणि पक्षाची मांडलेली भूमिका याबद्दल पक्षाच्या माध्यमातून केलेल्या कार्याचा अहवाल संसद रत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्याकडे सादर केला आहे.
सुप्रिया सुळे यांनी तो अहवाल पाहून किरण साठे यांचे तोंडभरून कौतुक केले आहे. एवढ्या मोठ्या शक्ती समोर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका अतिशय तळमळीने आणि निर्भीडपणे मांडत असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विचार सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी आणि विविध प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या कार्याबद्दल किरण साठे यांचे अभिनंदन केले.
