
मा.खा.विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खा.फंडातून करण्यात आलेल्या पिकअप शेडच्या कामाची चौकशी करावी यासाठी ३ फेब्रुवारी रोजी बहुजन ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन
प्रतिनिधी—सोलापूर—माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या फंडातून करण्यात आलेल्या पिकअप शेडच्या कामाची चौकशी करण्यासाठी ३ फेब्रुवारी रोजी बहुजन ब्रिगेडच्या वतीने अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग सोलापूर यांच्या कार्यालयाच्या विरोधात सोलापूर येथील पूनम गेट समोर बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.
माढा लोकसभेचे माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांच्या खासदार फंडातून या मतदारसंघात उभारण्यात आलेल्या पिकअप शेडच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता व इस्टीमेंट प्रमाणे त्यामध्ये लोखंड,पत्रा,लोखंडी पाईप हे वापरण्यात आले नसल्याची शक्यता असून ह्या एक पिकअप शेड बनविण्यासाठी जेवढा निधी खर्च झाला असल्याचे दिसून आले आहे,प्रत्येक्षात बाजारभावमध्ये एक पिकअप शेड बनविण्यासाठी तेवढा खर्च येत नसल्याची शक्यता असून या कामामध्ये मोठया प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी ३ फेब्रुवारी रोजी सोलापूर येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांच्या विरोधात तीव्र स्वरूपात बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे.