
महाविकास आघाडी सरकारचे निर्णय आणि सुपरफास्ट अजितदादा..
5 जानेवारी 2020 या दिवशी महाविकास आघाडीच खातेवाटप जाहीर याझाल. महिना व्हायला अजून 8 दिवस बाकी आहेत.या 22-23 दिवसात महाविकास आघाडीने कामांचा सपाटा उडवला आहे.
काय काय निर्णय घेतले महाविकास आघडीने ते आधी आपण पाहुयात.
1. 2 लाखपर्यंतची शेतकरी कर्जमाफी.
2. तृतीय पंथीयांसाठी “कल्याण मंडळ” स्थापन करन्यात येत आहे.
3. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असणाऱ्या जिल्हा रुग्णालयात अतिशय अल्पदरात केमोथेरपी ची सुविधा “टाटा कॅन्सर हॉस्पिटल” च्या माध्यमातुन देण्यात येणार आहे.
4. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाची उंची वाढविण्या सोबतच त्यासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व परवानग्या देण्यात आल्या आहेत.
5. रायगड जिल्ह्यासाठी 234 कोटी रुपयांच्या प्रारूप आरखाड्यांना मान्यता.
6. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या विकासासाठी 118 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता.
7. मुंबई शहराच्या विकासासाठी 140 कोटी रुपये देण्यात आले आहेत.
8. भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडे ला पुन्हा नोटीस बजावण्यात येणार.तर खोट्या केसेस टाकून अडकवलेल्या तरुणांवरील केसेस मागे घेण्यात येणार.
9. मालेगाव स्फोटातील चौकशी करणाऱ्या प्रोसिक्युशन टीममध्ये बदल करून पुन्हा चौकशी होणार.
10. मुंबईतील 16000 पात्र सफाई कर्मचाऱ्यांना त्यांच्या हक्काची घर देण्याचा निर्णय घेण्यात आला.
11. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाचे भागभांडवल 300 कोटी वरून 500 कोटीपर्यंत वाढवणार.
12. पुणे जिल्ह्यातल्या शहरी आणि ग्रामीण भागांतल्या रस्त्यांची कामे दर्जेदार करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.
13. सातारा जिल्ह्यातल्या कास तलावाची उंची वाढवणे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या संग्रहालयासाठी, शासकीय विश्रामगृहासाठी, सज्जनगड रोप-वेसाठी, मेडिकल कॉलेजसाठी निधी देण्याचा निर्णय घेतला गेलाय.
14. पुरबाधित सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातले रस्ते आणि पुलांची उंची वाढवण्यासंदर्भातले प्रस्ताव विभागीय आयुक्त कार्यालयाव्दारे पाठवण्याचे निर्देश दिले गेलेत.
15. करवीर निवासिनी अंबाबाई देवी मंदिर विकासासाठी राज्य योजनेतून भरीव निधी, इचलकरंजीच्या इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयाला दोन टप्प्यात निधी देण्याचं ठरलं आहे
16. कोल्हापूर शहराची थेट पाईपलाईन योजना आणि शाहू मिलमधील राजर्षी शाहू महाराजांच्या स्मारकाच्या कामाला गती देण्याचे निर्देश दिले गेलेत.
17. उजनी धरणातून सोलापूर शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणी पुरवठ्यासंदर्भातली पुढची बैठक घेण्याबाबत सूचित केलं गेलंय.
18. कोकण विभागातल्या जिल्ह्यांचा मानव विकास निर्देशांक, शहरी आणि ग्रामीण लोकसंख्या, क्षेत्रफळ आदी निश्चित निकषांच्या आधारावर जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत निधी उपलब्ध करून दिला जातोय.
19. गेट-वे ते मांडवा स्पीड बोट सेवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रमहर्षी बाळशास्त्री जांभेकर यांचं स्मारक, विद्यार्थी वसतिगृहं, माळशेज घाट परिसरात निसर्ग न्याहाळण्यासाठी ‘ग्लास ब्रीज’ आदी उपक्रम राबवले जातील.
20. सर्वसामान्य नागरिकांच्या मुलांच भविष्य लक्षात घेऊन राज्यभरात 6 ITI हब राज्य सरकार उभे करणार आहे. राज्य सरकारचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. जवळपास 10000 कोटींची तरतूद करण्यात येणार आहे.
21. दिंडीमध्ये जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी देहू-पंढरपूर आणि आळंदी-पंढरपूर, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग अशा चौपदरी पालखी मार्गांच्या दोन्ही बाजूस पायी चालत जाण्यासाठी साडेपाच मीटरची जागा, पालखी मार्गांतले विसावे, मुक्काम यांसाठी निधी लवकरात लवकर देण्याची तरतूद केली जाणार आहे.
22. वनाज-रामवाडी मेट्रोचा विस्तार चांदणी चौक ते वाघोलीपर्यंत,शिवाजीनगर-हिंजवडी मेट्रोचा विस्तार माणपर्यंत करण्याचा निर्णय झालाय.
23. याशिवाय निगडी ते चाकण दरम्यान मेट्रोच्या चाचपणीची अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्यात.प्रकल्पाशी संबंधित प्रस्ताव,वित्तीय तरतुदीत अडथळा येणार नाही,याची काळजी घेतली जात आहे.
24. पिंपरी-स्वारगेट मेट्रो मार्गाचा विस्तार निगडी ते कात्रज असा होईल. मार्गाचं नाव बदलून ते पुणे पिंपरी-चिंचवड महामेट्रो करण्याबाबत सूचना देण्यात आल्यात. याशिवाय वारजे ते शिवाजीनगर दरम्यान मेट्रो मार्गाचा विचार करण्याच्या सूचना केल्या.तसेच हडपसर-स्वारगेट मार्ग नव्यानं प्रस्तावित ठेवण्यात आलाय.
25. ग्राहकाला चांगला माल आणि उत्पादकांना चांगला दर मिळावा, या दुहेरी हेतूनं महाराष्ट्र राज्य कृषी व्यवसाय आणि ग्रामीण परिवर्तन (SMART) हा कार्यक्रम कृषी विभागातर्फे राबवण्याचा निर्णय घेतला गेलाय. ज्या भागांत जी पिकं-फळं होतात त्यांना योग्य बाजारपेठ मिळावी, यासाठीही प्रयत्न केला जाईल.
26. ‘लंडन आय’च्या धर्तीवर ‘मुंबई आय’ प्रकल्प उभारण्याची योजना आहे. वांद्रे-वरळी सी-लिंक जवळ हा प्रकल्प साकारला जाईल. या प्रकल्पामुळे पर्यटकांना आकाशातून संपूर्ण मुंबईचे विलोभनीय असे दृश्य पाहता येणार आहे.
27. महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येकाला मराठी लिहिता-वाचता आलंच पाहिजे आणि आपली मातृभाषा टिकली पाहिजे, यासाठी राज्यात सर्वभाषिक शाळांमध्ये पहिली ते दहावीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्याबाबत मंत्रिमंडळात लवकरच सकारात्मक निर्णय घेतला जाईल.
28. कायदा आणि सुव्यवस्था राखणाऱ्या पोलिसांच्या घरांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन आता मुंबई, पुणे, बारामती अशा विविध ठिकाणी त्यांच्यासाठी ५०० स्क्वे.फुटांपर्यंतची हजारो घरं बांधली जाणार आहेत.
अजून असे अनेक निर्णय आहेत. अनेक मला माहिती नाही.
विशेष म्हणजे यातले 70% निर्णय एकट्या अजितदादांनी घेतलेत. सकाळी 6 ला दादा फिल्डवर असतात. एकामागोमाग एक धडाकेबाज निर्णय घेत दादांनी कामाचा धुरळा उडवलाय. इथल्या माध्यमांनी दादांना बदनाम करण्याची एक संधी सोडली नाही.पण आता ज्या प्रकारे दादा काम करत आहेत त्यावर मात्र एका शब्दाने तोंड उघडत नाहीत. बाकी अजून एक गोष्ट आपल्या लक्षात आणून देतो,
“महाविकास आघाडीने इतके निर्णय मागच्या 22-23 दिवसात घेतले आहेत.पण यातल्या किती विषयावर इथल्या माध्यमांनी तुम्हाला याबद्दल सरळ सरळ माहिती दिली..? यावर किती चॅनेल्स ने चर्चा घेतल्या..?
नसेल दाखवत तर एक लक्षात घ्या,तुम्ही चुकीच्या लोकांना फॉलो करताय..!
*मा.श्री.किरण तानाजी साठे*
*सोलापूर जिल्हा सरचिटणीस ,राष्ट्रवादी काँग्रेस*