भारतीय जनता पक्षावर बहिष्कार टाकाने हाच महामानवांचा सन्मान ठरेल – किरण साठे

भारतीय जनता पक्षावर बहिष्कार टाकाने हाच महामानवांचा सन्मान ठरेल – किरण साठे

अकलूज मध्ये कोश्यारी,पाटील,त्रिवेदी,लाड यांच्या निषेधार्थ मोर्चा

प्रतिनिधी : अकलूज : दिनांक १५ डिसेंबर रोजी अकलूज मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द काढणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी,आमदार प्रसाद लाड,तसेच महात्मा ज्योतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल अपशब्द काढणारे महाराष्ट्र राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निषेधार्थ सर्व पक्षीय,सर्व संघटना व बहुजन समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.सदर मोर्चा डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक ते गांधी चौक,गांधी चौक ते सदूभाऊ चौक ते पुन्हा डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासमोर आल्यानंतर मोर्चा चे रूपांतर सभेमध्ये झाले.सदर मोर्चा मोठ्या संख्येने बहुजन समाज व सर्व पक्षीय कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.मोर्चाचे निवेदन नायब तहसीलदार देसाई मॅडम यांनी स्वीकारले,अकलूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर,अकलूज गावचे तलाठी शिंदे उपस्थित होते.

मोर्चाला संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस आणि बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी,मंत्री चंद्रकांत पाटील,भाजपचे प्रवक्ते त्रिवेदी,आमदार प्रसाद लाड,यांचा खरपूस समाचार घेतला.भाजपला सत्तेत न येवू देणे हीच छत्रपती शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिराव फुले,डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली आहे,तसेच माळशिरस तालुक्यातील भाजप पक्षामध्ये काम करणाऱ्या लोकांना मतदान न करता त्यांच्यावर बहिष्कार टाकावा असे आवाहन किरण साठे यांनी मोर्चा दरम्यान केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom