सह आयुक्त लोकरे,मुख्याधिकारी गाढवे,खांडेकर यांच्या संपूर्ण कामाची होणार चौकशी
नगरपालिका सह आयुक्त यांचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
प्रतिनिधी : माळशिरस : तुळजापूर येथे कार्यरत असताना आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेले आशिष लोकरे यांची सह आयुक्त व प्रशासन अधिकारी या पदावरून हकालपट्टी करून माळशिरस नगरपंचायत चे मुख्याधिकारी श्री गाढवे आणि नातेपुते नगरपंचायतचे मुख्याधिकारी खांडेकर यांच्या घनकचरा व्यवस्थापन टेंडर सहित इतर संपूर्ण कामकाजाची चौकशी करण्यात यावी या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या नेतृत्वाखाली विभागीय आयुक्त पुणे येथे ५ डिसेंबरला तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलनाची दखल घेवून पुणे विभागाच्या नगरपालिका विभागाच्या सह आयुक्त पूनम मेहता यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना आदेश काढून बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे आंदोलनाच्या अनुषंगाने आर्थिक घोटाळ्याचे आरोप झालेले लोकरे व माळशिरस नगरपंचायत मुख्याधिकारी व नातेपुते नगरपंचायत चे मुख्याधिकारी यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करून त्यांच्या कारभाराची विभागीय स्तरावरून चौकशी करून सेवेतून बडतर्फ करून तुळजापूर नगरपरिषदेमध्ये कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचे आरोप असलेले तत्कालीन मुख्याधिकारी व सद्या सोलापूर नगरपरिषद प्रशासन अधिकारी व सह आयुक्त म्हणून कार्यरत असलेले आशिष लोकरे यांची हकालपट्टी करण्याबाबत कार्यालयास किरण साठे यांचे निवेदन प्राप्त झाले आहे,किरण साठेंच्या निवेदनामधील मुद्यांच्या अनुषंगाने चौकशी करून आपले स्वयंस्पष्ट अभिप्राय सह अहवाल तात्काळ सादर करण्याचा आदेश दिला आहे.त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील नगरपंचायत,नगरपालिका मध्ये काम करणाऱ्या मुख्याधिकारी आणि कर्मचारी यांच्यामध्ये खळबळ उडाली आहे.
