मांडवे येथील जे एम म्हात्रे कंपनी कामगार कायद्याचे उल्लंघन करून कामगारांची करते पिळवणूक

मांडवे येथील जे एम म्हात्रे कंपनी कामगार कायद्याचे उल्लंघन करून कामगारांची करते पिळवणूक

कारवाईच्या मागणीसाठी अप्पर कामगार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ५ डिसेंबर ला आंदोलन.

प्रतिनिधी : पुणे : मांडवे ता. माळशिरस येथील जे एम म्हात्रे इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी पुणे विभागाचे कामगार अप्पर आयुक्त यांना संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या उपस्थितीत निवेदन देवून ५ डिसेंबर ला आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

पुणे पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे ठेकेदार कंपनी जे एम म्हात्रे या कंपनीमध्ये अनेक कामगारांचा इन्शुरन्स नाही तसेच आपल्या विभागाकडे कोणतीही नोंदणी नाही कामगारांना कोणत्याही प्रकारचे सेफ्टी संरक्षण, कामगारांना किमान वेतन दिले जात नाही तसेच कामगारांची मोठ्या प्रमाणात पिळवणूक होत असते सदर कामगारांची कोणत्याही कार्यालयात नोंदणी नसल्याचे दिसून आले आहे सदर कामगारांना कामगारांचे निवासस्थान लेबर कॅम्प एकदम निकृष्ट दर्जाचे धोकादायक पत्र्याचे शेड आहे ते शेड पडून मोठ्या प्रमाणात अपघात होऊन कामगारांना धोका होण्याची शक्यता आहे सदर लेबर कॅम्प हायवे लगत असल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे कंपनीच्या कामगारांमध्ये 80 टक्के परप्रांतीय कामगार असल्याने कामगारांची कुठलीही काळजी घेतली जात नाही असे निवेदनात म्हटले आहे.

तसेच कामगारांची पिळवणूक मोठ्या प्रमाणात केली जात आहे,सदर कंपनी संदर्भात सोलापूर येथील उपायुक्त घोडके यांना वेळोवेळी कल्पना देऊनही घोडके साहेब यांनी कोणतीही दखल घेतलेली नाही सदर कंपनीने कामगारांच्या जीवाशी खेळ करून अनेक कामगारांचा या ठिकाणी अपघात होऊन मृत्यू झालेला आहे,अनेक कामगारांना अपंगत्व आलेले आहे,जे एम म्हात्रे कंपनी कामगार कल्याण कायद्याची कुठलीही अंमलबजावणी करत नाही असे प्रथमदर्शी उघड उघड दिसत आहे जे एम म्हात्रे कंपनीची चौकशी करून कंपनीवर कामगार कायद्यानुसार दिनांक ४ डिसेंबर पर्यंत कारवाई करावी अन्यथा अप्पर कागमार आयुक्त यांच्या कार्यालयासमोर ५/१२/ २०२२ ला बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom