पुणे येथील आर टी ओ कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेड चे आंदोलन
५ डिसेंबरला तृतीयपंथी यांना घेवून पुणे आर टी ओ कार्यालयासमोर आंदोलन – बहुजन ब्रिगेड
प्रतिनिधी : पुणे
जे एम म्हात्रे यांच्या कंपनीमध्ये होत असलेल्या ओव्हरलोड वाहतूक,बेकायदेशीर चालणारी वाहने यांच्यावर कारवाई न करणाऱ्या आणि चेक पोस्ट न उभारणाऱ्या अकलूज आर टी ओ कार्यालयातील वायूवेग पथक मध्ये असलेल्या अधिकारी आणि मोटार वाहन निरीक्षक अश्विनकुमार पोंदकुळे यांच्यावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुणे येथील आर टी ओ च्या प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर बहुजन ब्रिगेडचे अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले.
माळशिरस तालुक्यातील मांडवे येथे आळंदी ते पंढरपूर महामार्गाचे काम करणाऱ्या जे एम म्हात्रे या कंपनीचा प्लांट असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर ओव्हरलोड वाहतूक, तसेच बेकायदेशीर, कागदपत्रे पूर्ण नसलेली वाहने, वाहतुकी अयोग्य वाहने काम करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अकलूज येथील आर टी ओ कार्यालायासमोर हलगीनाद आंदोलन करण्यात आले होते,त्याची दखल घेऊन अकलूज आर टी ओ कार्यालयातील वायूवेग पथकाने नावालाच कारवाई केली असल्याचे दिसून आले,त्यांनतर कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही,त्याचा निषेध करण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे.पुणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाने तात्काळ दखल न घेतल्यास ५ डिसेंबर रोजी तृतीयपंथी यांना बरोबर घेवून टाळ्या वाजवण्याचे आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
