संविधान बचाव देश बचाओ घोषणा देत मैत्री प्रतिष्ठान ने केला संविधान दिन उत्साहात साजरा..

संविधान बचाव देश बचाओ घोषणा देत मैत्री प्रतिष्ठान ने केला संविधान दिन उत्साहात साजरा..

संविधान दिनानिमित्त लहान मुला मुलींना मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका च्या माध्यमातून शालेय साहित्य वाटप

माळशिरस तालुक्यातील वेळापूर येथे शनिवारी संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष महेश शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वेळापूर सोलापूर जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळा येथे मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.मैत्री प्रतिष्ठान माळशिरस तालुका यांच्या वतिने मा.संजय जी वाघमोडे यांच्या नेतृत्वात लहान मुला मुलींना शालेय “शिक्षणाची आवड निर्माण होण्यासाठी शालेय साहित्याचे वाटप करून संविधान दिन साजरा करण्यात आला.”
प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मा.रमेश वाघमारे सर यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी शाळेमध्ये संविधान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून “मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे सहसचिव अक्षय जी गायकवाड उपस्थित होते.” तसेच मैत्री प्रतिष्ठानच्या (महिला) जिल्हा अध्यक्ष निता ताई सुळे मॅडम, मैत्री प्रतिष्ठानचे तालुका अध्यक्ष संजय वाघमोडे, तालुका उपाध्यक्ष शंकर जी मस्के, सामाजिक कार्यकर्ते भारतीय दलित संसद चे जिल्हा उपाध्यक्ष अजितदादा साठे, नाभिक संघटना तालुका अध्यक्ष राहुल सराटे सर्व शिक्षक,विद्यार्थी व गावातील नागरिक उपस्थित होते.तर शिक्षणाचे महत्व व संविधानाचे महत्व पटवून पटवून देण्यासाठी मैत्री प्रतिष्ठानचे महिला जिल्हाध्यक्ष नीताताई सुळे, भारतीय दलित संसद चे जिल्हा उपाध्यक्ष अजित दादा साठे व मैत्री प्रतिष्ठानचे अजय मखरे यांनी आपले मत व्यक्त केले.या कार्यक्रमाचे नियोजन मैत्री प्रतिष्ठानचे तालुकाध्यक्ष संजय वाघमोडे, शंकर मस्के यांच्या नेतृत्वात झाले.कार्यक्रमासाठी शंकर मस्के नीता ताई सुळे यांनी अतिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom