अकलूजमधील विकासनगर येथील महिलांच्या शौचालयाचा प्रश्न लागला मार्गी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसंवाद यात्रेचा इफेक्ट
प्रतिनिधी : अकलूज : महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या संकल्पनेतून अकलूज मध्ये जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती.त्यावेळी अकलूजमधील विकासनगर येथील महिलांच्या शौचालयाचा दुरुस्तीचा प्रश्न अकलूज नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून मार्गी लावण्याचे आश्वासन आणि वाचन दिले होते. तो शौचालयाचा प्रश्न मार्गी लागला आहे.यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे,अकलूज शहराध्यक्ष सुरेश गंभीरे,युवा नेते नवनाथ कसबे,बाळू आण्णा खिलारे युवक शहराध्यक्ष जाकीर शेख इत्यादी उपस्थित होते.
या जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून अकलूज मधील परिसरात असलेल्या समस्या सोडवण्यासाठी त्याच पद्धतीने जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याच्या उद्देशाने ही जनसंवाद यात्रा आयोजित करण्यात आली होती.याच जनसंवाद यात्रेच्या अनुषंगाने विकास नगर येथे जनसंवाद यात्रा गेल्यानंतर तेथील महिलांनी महिलांच्या शौचालयाचा प्रश्न प्रखरतेने आमच्यासमोर मांडला आणि तो प्रश्न सोडवण्याचा शब्द आणि वचन आम्ही जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दिले होते.त्याच शौचालयाच्या दुरुस्तीसाठी अकलूज नगरपरिषदेकडे पाठपुरावा करून दुरुस्त केले आहे आणि ते शौचालय महिलांच्या उपयोगात आणले असून त्या ठिकाणी शौचालय सुरू झाले आहे. जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून दिलेले वचन पूर्ण झाले असून या शौचालयाचे काम पूर्ण झाले आहे.महिलांची शौचालयासाठी होणारी गैरसोय थांबल्याने विकास नगर परिसरातील महिलांनी जनसंवाद यात्रेचे व किरण साठे यांचे आभार व्यक्त केले आहेत केले आहे.
