जि प कार्यकारी अभियंता श्री देसाई यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

जि प कार्यकारी अभियंता श्री देसाई यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन

प्रतिनिधी : पुणे : पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर पुणे जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री देसाई यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी दिनांक ७/११/२२ रोजीच्या बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांनी दिला आहे.

इंदापूर तालुक्यातील मौजे शेटफळ हवेली येथील बावडा शेटफळ हवेली रस्ता ते भोंगळे वस्ती हा रस्ता स्थानिक विकास ग्रामपंचायत स्तर जि प निधीमधून १० लाख रुपये मंजूर असून संबंधित कामाच्या अंदाजपत्रकात मुरुमाचा भरावा हा २००MM व GI चा एक लेअर या प्रमाणे अंदाजपत्रकात तरतूद करण्यात आली होती,मात्र सदर रस्त्याच्या कामामध्ये अंदाजपत्रकात नमुद केल्याप्रमाणे काम करण्यात आले नाही,यामध्ये संबंधित शाखा अभियंता यांनी अनियमितता केल्याचे स्पष्ट झाले आहे. संबंधित रस्त्याची तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर रस्त्याच्या कामात २०० MM चा भरावा करण्यात आला नसल्याचे दिसून आले आहे,शाखा अभियंता यांनी मनमानी कारभार करून रस्त्याच्या कामामध्ये पैसे खाण्याच्या व भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने हे बेकायदेशीर काम केल्याचे दिसून आले आहे,त्यामुळे स्वतः ला वाचवण्यासाठी शाखा अभियंता हे गावातील सरपंच व नागरिकांनी २०० MM चा भरावा न करता रस्त्याची लांबी वाढवून रस्त्याचे खडीकरण करावे अशी मागणी केली होती,त्याप्रमाणे सदर कामाची लांबी वाढविण्यात आली असल्याचे सांगत आहेत.निवेदनात म्हटले आहे.मात्र अंदाजपत्रकात नमूद असल्या प्रमाणेच काम करावे लागते हे माहीत असताना कार्यकारी अभियंता यांच्याकडून परवानगी घेणे बंधनकारक होते मात्र त्यांनी स्वतःचा मनमानी कारभार केला आहे,आणि वरील सर्व प्रकार कार्यकारी अभियंता यांना अंदारात ठेऊन भ्रष्टाचार करण्याच्या उद्देशाने केला आहे.उगाच सरपंच व नागरिक यांना या स्वतःच्या चुकीच्या कामात ओढून स्वतःला वाचवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे तरी कार्यकारी अभियंता यांच्याकडे काम करण्याअगोदर कोणत्याही प्रकारची परवानगी न घेता काम करणे आणि अंदाजपत्रका प्रमाणाने काम न करणे या गोष्टीला जबाबदार धरून संबंधित शाखा अभियंता यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी करूनही कार्यकारी अभियंता हे संबंधित शाखा अभियंता यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट झाले आहे,तसेच सरपंच यांनी संबंधित शाखा अभियंता यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात मदत करण्याची भूमिका घेतल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी आणि शाखा अभियंता यांना संबंधित प्रकरणाची चौकशी करून तात्काळ निलंबित करण्यात यावे आणि त्यांच्या कार्यकाळात करण्यात आलेल्या सर्वच कामाची चौकशी करण्यासाठी एका समितीची स्थापना करण्यात यावी आणि शाखा अभियंता यांना पाठिशी घालणाऱ्या कार्यकारी अभियंता यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी पुणे येथील विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर दिनांक ७/११/२२रोजी तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा किरण साठेंनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom