पंढरपूर मधील एसटी स्टॅन्ड मध्ये संत रोहिदास महाराजांची प्रतिमा बसविण्याची मागणी
बहुजन ब्रिगेड संघटनेचा आक्रमक होत आंदोलनाचा इशारा
प्रतिनिधी : पंढरपूर : बहुजन ब्रिगेड संघटनेचे स संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहराध्यक्ष अमोल घोडके यांनी महाराष्ट्र राज्यातील भाविक नेहमीच पंढरपूरला येत असतात आणि त्यांचा प्रवास एसटी मधूनच होत असतो म्हणून सोलापूर जिल्ह्यातील सर्वात मोठ्या एसटी स्टँड मध्ये चर्मकार सामाजाचे प्रेरणास्थान असलेले शिरोमणी संत रोहिदास यांची प्रतिमा लावण्यात यावी अशी मागणी एसटी आगार प्रमुख यांना निवेदन देवून केली आहे. यावेळी संत रोहिदास कला क्रीडा शैक्षणिक सामाजिक बहुउद्देशीय संस्था अध्यक्ष रतिलाल बनसोडे, उमेश होनकळस चर्मकार नेते, सचिन कांबळे अध्यक्ष, संजय कारंडे साहेब, शैलेश आगावणे राष्ट्रीय चर्मकार अध्यक्ष, संजय गवळी चर्मकार आध्यक्ष, पत्रकार ज्योतिराम कांबळे उपस्थित होते.शिरोमणी संत रोहिदास यांच्या प्रतिमेच्या मागणीवर बहुजन ब्रिगेड संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.
महाराष्ट्र राज्यात पंढरपूर हे नामांकित आराध्य दैवत असून पंढरपूर हे संतांचे माहेर घर म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते,पंढरपूर शहरामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून व देशातून भाविक येत असतात त्यांना शिरोमणी संत रोहिदास यांचे कार्य माहीत व्हावे तसेच त्यांच्या कार्याचा सर्वत्र प्रचार व्हावा आणि त्यांचे काम फक्त चर्मकार समाजपुरते मर्यादित नाही हे समजण्यासाठी पंढरपूर येथील एसटी स्टँड मध्ये त्यांचे तैलचित्र(प्रतिमा) लावण्यात यावी अन्यथा तीव्र स्वरूपात आंदोलन छेडले जाईल असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष अमोल घोडके यांनी दिला आगार व्यवस्थापक यांना दिला आहे.
