गिरजनी चौक कडून फत्तेसिंह नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तुटलेला चेंबर ठरतोय नागरिकांसाठी जीवघेणा – महेश शिंदे

गिरजनी चौक कडून फत्तेसिंह नगर कडे जाणाऱ्या रस्त्यावरील तुटलेला चेंबर ठरतोय नागरिकांसाठी जीवघेणा – महेश शिंदे

महेश शिंदे यांनी मैत्री प्रतिष्ठान च्या माध्यमातून केली चेंबर दुरुस्तीची मागणी

अकलूज येथील गिरजणी चौक ते फत्तेसिंह नगर रस्त्यावरील तुटलेला चेंबर प्रवाशांसाठी व नागरिकांसाठी जीवघेणा ठरत आहे.खासकरून रात्रीच्या सुमारास दुचाकीवाल्यांसाठी तर हे ठिकाण मृत्यूचा सापळा बनले आहे.गिरजणी चौकाकडून तो रस्ता गांधी चौक कडे जाण्यासाठी मध्यबिंदू मानला जातो.हा रस्ता अतिशय महत्त्वाचा आहे. आठवडे बाजार नवीन बाजारतळ व कृषी उत्पन्न समिती याकडे जाण्यासाठी नागरिक प्रामुख्याने याच रस्त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. तसेच नवीन बाजार तळ परिसरातील स्थानिक ग्रामस्थ, लहान-मोठे उद्योग व्यावसायिकांची येथील रस्त्यांवर दिवसभर मोठी वर्दळ असते.रस्त्याच्या मधोमध असणाऱ्या गिरणी चौक ते फत्तेसिंग नगर रस्त्यावर तुटलेल्या अवस्थेतील चेंबर,जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे.
विशेष म्हणजे या समस्यांचे निराकरण करण्यासाठी कोणी तत्परता दाखवत नसल्याने स्थानिकांसह नगरातून संताप व्यक्त होत आहे. या दुरवस्था झालेल्या चेंबर्सची तत्काळ दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी मैत्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष महेश शिंदे हे करत आहेत.चेंबर्सची पूर्ण दुर्दशा मुळे जीव मुठीत धरून वाहने चालवावी लागत आहे. विशेष म्हणजे या नगरात ग्रामपंचायत काळात असताना तीन ग्रामपंचायत सदस्य होते तरीही याकडे कोणाचेही लक्ष गेले नाही? मागील अनेक वर्षांपासून हा धोकादायक चेंबर्स अशाच अवस्थेत असल्याने नागरिक आश्चर्य व्यक्त करत आहे. नगरातील परिसरात स्थानिक नगरपरिषद प्रशासनासह, सार्वजनिक बांधकाम विभाग या स्वतंत्र अधिकार असणाऱ्या यंत्रणा कार्यान्वित आहेत.
अनेकदा परिसरात काही मूलभूत समस्या निर्माण झाल्यास सगळ्याच यंत्रणा अनेक दिवस बघ्याची भूमिका घेत असतात. त्यामुळे नगराचा रहिवासी म्हणून व एक सामाजिक कार्यकर्ता पदाधिकारी म्हणून महेश शिंदे वारंवार असे प्रश्न उचलत असतात. लवकरात लवकर चेंबर बसवण्यात यावा यासाठी महेश शिंदे अकलूज नगर परिषदेकडे निवेदन अर्ज सादर केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom