पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र यांना बहुजन ब्रिगेडचे निवेदन
टेंभुर्णी पोलीस स्टेशन हद्दीतील अवैद्य धंदे बंद करून पोलीस निरीक्षक निंबाळकर यांच्यावर कारवाई करण्याची मागणी
प्रतिनिधी : कोल्हापूर : बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली टेंभुर्णी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांच्या कार्यक्षेत्रात येणारे अवैद्य धंदे तसेच बेकायदेशीरित्या चालणारे अवैद्य धंदे त्वरित बंद करण्यात यावेत या मागणीसाठी बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.
तसेच संबंधित बेकायदेशीर रित्या चालणारे अवैद्य धंदे तात्काळ बंद करण्यात यावेत अशी मागणी करून संबंधित पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांचे अवैद्य धंदे असलेल्या लोकांबरोबर संबंध असल्याने त्यांच्या धंद्यांना अभय मिळत असल्याचा आरोप बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे यांनी कोल्हापूर परिक्षेत्र विभागाचे पोलीस महानिरीक्षक यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच तात्काळ अवैद्य धंदे बंद न केल्यास सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १ नोव्हेंबर रोजीपासून बेमुदत धरणे आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

