२४ जानेवारी – महाराष्ट्र
२४ जानेवारी – माळशिरस तालुका बंद

*देशाची ढासळलेली अर्थव्यवस्था याचा जाब सरकारला विचारण्यासाठी व ४०% हिंदूंच्या नागरिकत्वावर गदा आणण्याचे काम करणाऱ्या भारतीय संविधानविरोधी CAA व NRC या कायद्याच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी व इतर ६० सामाजिक संघटनांनी २४ जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदला वेगवेगळ्या सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचा अजूनही पाठिंबा सुरूच आहे.*
*याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी माळशिरस तालुक्याच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी माळशिरस तालुक्याचा बंद शांततेत पार पाडण्यासाठी माळशिरस तालुक्यातील सर्व प्रमुख पोलीस स्टेशनला निवेदन दिले आहे.*
*सद्यस्थितीत देशाचा GDP घसरला आहे, GST मुळे ग्राहक वर्ग खरेदीच्या मानसिकतेत नसून त्याचा परिणाम व्यापारावर होत आहे. केंद्र सरकारकडून वारंवार रिझर्व बँकेतील जनतेच्या गंगाजळीवर ताव मारला जात आहे, अर्थव्यवस्था तोट्यात घालवून सार्वजनिक नवरत्ने म्हणजेच जनतेच्या मालकीची असणाऱ्या व सरकारला कायम फायदा मिळवून देऊ शकणाऱ्या सरकारी कंपन्याचं खाजगीकरण करून जनतेची मालमत्ता खाजगी लोकांच्या घशात घातली जात आहे. यांमुळे देशाची अर्थव्यवस्था आर्थिक दिवाळखोरीत निघणार असुन सरकारने यांसारख्या मुद्द्यावरून तसेच शिक्षणाची समस्या, आरोग्याची समस्या, रोजगाराच्या समस्या, भुखमारीच्या समस्या यावरून लक्ष हटविण्यासाठी CAA व NRC यांसारख्या ४०% हिंदूंच्या नागरीकत्वाला बाधा पोहचविणाऱ्या संविधानविरोधी कायद्याची अंमलबजावणी करण्याचा घाट घालतेय.*
*याद्वारे आम्ही माळशिरस तालुक्यातील व्यापारी वर्ग, किरकोळ विक्रेते व सर्व सुज्ञ नागरीकांना आवाहन करीत आहोत की देशहिताच्या मुद्द्यावर केंद्र सरकारचे डोके ठिकाणावर आणण्यासाठी सर्वांनी या बंदमध्ये सहभागी होऊन उत्स्फूर्तपणे व शांततेत हा बंद यशस्वी करावा🙏🙏🙏*
*No_CAA_NRC*
*✍अभिजीत गायकवाड*