मांडवे येथील रस्त्याच्या कामाची चौकशी करण्याच्या मागणीसाठी बहुजन ब्रिगेडचे ठिय्या आंदोलन
संबंधित प्रकरणाचा अहवाल कार्यकारी अभियंता यांना पाठविण्याचे बीडीओचे आश्वासन
प्रतिनिधी : माळशिरस : मांडवे गावातील 51 फाटा ते मांडवे या रस्त्यासह अनेक मांडवे परिसरातील रस्त्याच्या कामाची चौकशी करावी या मागणीसाठी माळशिरस पंचायत समिती समोर बहुजन ब्रिगेड संघटनेचे अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित ठिय्या आंदोलन करण्यात आले.
सदर आंदोलन बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी केले होते,यावेळी बहुजन ब्रिगेड संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे,जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे,तालुका अध्यक्ष धनाजी पाटील,वाहतूक संघटना जिल्हाध्यक्ष माऊली पालवे,मांडवे ग्रामपंचायत माजी सदस्य बलभीम भोंडवे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अकलूज शहराध्यक्ष जाकीर शेख,प्रताप पालवे,सैलानी सय्यद,विकास केसकर,सचिन साळुंखे,अविनाश लोखंडे,धोंडिबा शेंडगे,लखन शिंदे,सतीश बनकर,तसेच मांडवे गावातील अनेक ग्रामस्थांनी आंदोलनाला भेटी देवून उपस्थिती लावली.आंदोलनाला खळबळनामा चे आप्पासाहेब कर्चे,क्रांतिकारी संघर्ष सेनेचे अध्यक्ष गणेश भोसले,दलित महासंघाचे पश्चिम महाराष्ट्र सरचिटणीस सचिन रणदिवे यांनी पाठिंबा दिला.
सदर आंदोलनस्थळी माळशिरस पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री गुळवे यांनी भेट देवून लेखी पत्र दिले आणि आंदोलन कर्त्याच्या मागणीनुसार सोलापूर जिल्ह्या परिषदेचे कार्यकारी अभियंता यांच्याकडे अहवाल पाठविणार असल्याचे आश्वासन दिले,त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.
सदर रस्त्याच्या बाबतीत गटविकास अधिकारी यांना जिल्हापरिषद बांधकाम विभागाचे उपअभियंता यांनी दिलेला अहवाल मान्य नसल्याने बहुजन ब्रिगेड संघटना सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर येत्या आठ दिवसांत तीव्र स्वरूपात आंदोलन करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी सांगितले.
चौकट
मांडवे गावातील काम केलेल्या दत्त विजय या सोसायटीच्या माध्यमातून करण्यात आलेल्या माळशिरस तालुक्यातील सर्व कामाची चौकशी करून त्यांच्यावर तात्काळ काळ्या यादीमध्ये टाकण्याची कारवाई करण्यासाठी १५ तारखेला तीव्र स्वरूपात सोलापूर जिल्हा परिषदेच्या समोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार आहे,संबंधित दत्त विजय सोसायटीच्या माध्यमातून निकृष्ट दर्जाचे काम केले जात असल्याचे मांडवे गावातील कामामधून सिद्ध झाले आहे,कार्यकारी अभियंता यांनी संबंधित सोसायटीच्या कामाची चौकशी करून कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे,या सोसायटीवर काळ्या यादीमध्ये टाकण्यासाठी शेवटपर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून लढा देणार आहे.एका महिण्यातच काळ्या यादीमध्ये टाकण्याची प्रक्रिया होईल.
दत्ता कर्चे
प्रदेशाध्यक्ष – बहुजन ब्रिगेड संघटना
