मांडवे माजी ग्रा.पं.सदस्य बलभीम भोंडवे यांची बहुजन ब्रिगेडच्या तालुका उपाध्यक्षपदी निवड.
मांडवे प्रतिनिधी… संस्थापक अध्यक्ष किरण साठे व प्रदेश अध्यक्ष दत्ता कर्चे यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थित मांडवे ग्रामपंचायतचे माजी सदस्य बलभीम भोंडवे यांची बहुजन ब्रिगेड संघटनेच्या माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली बलभीम भोंडवे मांडवे ग्रामपंचायतचे माजी सदस्य असल्याने गावगाड्यातील बराचसा अनुभव त्यांना असल्याने तसेच सामाजिक व राजकीय आवड असल्याने बलभीम भोंडवे यांची माळशिरस तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. यावेळी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष राजेश खरे जिल्हाध्यक्ष राहुल शिंदे वाहतूक विभाग जिल्हाध्यक्ष ज्ञानदेव पालवे माळशिरस तालुका अध्यक्ष धनाजी पाटील, प्रताप पालवे ,धोंडीबा शेंडगे उपस्थित होते
