मांडवे पंचायतसमिती गणा मधून योगिताताई गोरक्षनाथ पालवे प्रबळ दावेदार……
सदाशिवनगर प्रतिनिधी –
मांडवे पंचायत समिती गणा मधून सदाशिवनगर च्या कार्यसम्राट कार्यशील माजी उपसरपंच विद्यमान सदस्य योगिताताई गोरक्षनाथ(दादा) पालवे
मांडवे पंचायत समिती गण मधून प्रबळ दावेदार आहेत. योगिताताई पालवे या सदाशिवनगर चे युवा नेते व समाज कार्यामध्ये गेले अनेक वर्षांमध्ये ज्यांचं नाव प्रामुख्याने पुढे असते ते गोरक्षनाथ उर्फ दादा पालवे यांच्या त्या पत्नी आहेत. माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागामध्ये दादासाहेब पालवे यांचे कार्य मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांना मानणारा वर्ग हा मोठ्या प्रमाणात आहे दादासाहेब पालवे यांचे सर्वच पक्षांमधील नेत्यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत विरोधक असू द्या नाहीतर सत्ताधारी सर्वांच्या बरोबरीने आणि सर्वांच्या उपयोगी पडणारे नेतृत्व म्हणून दादासाहेब पालवे यांची ओळख पश्चिम तालुक्यामध्ये मोठी आहे परिसरातील कोणतेही विकास कार्य असू द्या दादासाहेब पालवे हे झोकून ते कार्य पूर्ण करत असतात शांत आणि संयमी स्वभाव असल्याने दादासाहेब पालवे हे सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे नेतृत्व आहे मांडवे पंचायत समिती गणामध्ये मांडवे सदाशिवनगर आणि पुरंदावडे ही गावे आहेत. तिन्ही गावांमध्ये धनगर समाजाचे मोठ्या प्रमाणात प्राबल्य आहे सदाशिवनगर व पुरंदवडे या ग्रामपंचायतीमधील अनेक विकास कामांमध्ये दादासाहेब पालवे व योगिताताई पालवे यांचे मोठे योगदान आहे प्रशासकीय कार्याचा दांडगा अभ्यास असल्याने व उच्चशिक्षित असल्याने तसेच उपसरपंच पदाचा अनुभव असल्याने योगिताताई पालवे यांचे सध्यातरी पारडे जड आहे.
कोणत्याही परिस्थितीमध्ये योगिताताई गोरक्षनाथ पालवे पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांमधून बोलले जात आहे.

