माळशिरस तालुक्यातील कारागृहाचे काम झाले चालू

माळशिरस तालुक्यातील कारागृहाचे काम झाले चालू

किरण साठे यांच्या पाठपुराव्याला मिळाले यश

प्रतिनिधी : माळशिरस : माळशिरस तालुक्यात असलेल्या अकलूज, माळशिरस, नातेपुते, वेळापूर ही एकूण चार पोलीस स्टेशन कार्यरत आहेत,मात्र अनेक वर्षे झाली तालुक्यातील कारागृह नादुरुस्त असल्याने आपल्या तालुक्यातील कैद्यांना सोलापूर याठिकाणी पाठवावे लागत होते,आणि त्याचा नाहक त्रास तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना होत होता याची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी हा विषय महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे निवेदन देऊन माळशिरस तालुक्यातील कारागृह तात्काळ चालू करण्याची मागणी केली होती.माळशिरस तहसील कार्यालयातील कारागृहाचे काम चालू करण्यात आले आहे.सदर कामाची पाहणी माळशिरस तालुक्याचे तहसीलदार जगदीश निंबाळकर,राष्ट्रवादी काँग्रेसचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे,बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे,मनसे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे,रामभाऊ कचरे,जावेद शेख,इत्यादी उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यात अस्तित्वात असलेल्या अकलूज, नातेपुते,माळशिरस वेळापूर,चार पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांना पोलीस स्टेशन मध्ये येणाऱ्या कैद्यांना मॅजेस्टिक कस्टडी मंजूर झाल्यानंतर तालुक्याच्या ठिकाणी असलेले कारागृह नादुरुस्त असल्यामुळे संबंधित पोलीस कर्मचाऱ्यांना या कैद्यांना घेऊन सोलापूर या ठिकाणी जावे लागत होते आणि कोरोनाची चाचणी बंधनकारक असल्याने संबंधित कैद्यांना सोलापूरला घेऊन गेले असता कैद्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांची कोरोना चाचणी केल्यानंतर रिपोर्ट येईपर्यंत पोलिसांना त्या ठिकाणीच थांबावे लागत होते,असे अनेक प्रसंग तालुक्यातील चारही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांच्या समोर उभे ठाकले होते,मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सोलापूर जिल्हा सरचिटणीस व बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांनी महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती,त्यानंतर त्यांनी कारागृह दुरुस्त करण्यात यावे यासाठी सतत पाठपुरावा केल्यानंतर कारागृह विभागाचे महानिरीक्षक यांनी कनिष्ठ कारागृह हे महसूल विभागाच्या अंतर्गत येत असल्याचे पत्र सोलापूर जिल्हाधिकारी यांना पाठवलं आणि ते दुरुस्त करण्याच्या सूचना केल्या या सूचना केल्यानंतर किरण साठे यांनी सतत या विषयाचा पाठपुरावा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले आणि त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आणि माळशिरस तालुक्यातील तहसील कार्यालयात असलेल्या कारागृहाचे काम कारागृह विभागाच्या नियमानुसार करण्यास सुरुवात झाली असून येत्या दीड ते दोन महिन्यांच्या आत हे कारागृह सुरू करण्यात येईल आणि माळशिरस तालुक्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना होणारा त्रास कमी होईल असे किरण साठे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom