सोलापूर विद्यापीठाने वाढीव प्रवेशशुल्क व परीक्षा शुल्क वाढीचे परिपत्रक तात्काळ मागे घेण्याची मनविसेची मागणी
प्रतिनिधी : पंढरपूर : महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेने कडून अवधुत गडकरी मनविसे शहर उपाध्यक्ष यांनी मा. दिलीप बापू धोत्रे मनसे नेते, मा. सचिन पवार मनविसे पश्चिम महाराष्ट्र प्रभारी व, मा. विजय रोकडे मनविसे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आज माननीय तहसीलदार साहेब पंढरपूर यांना निवेदन देण्यात आले,,,
परीक्षा विभाग संचालक पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रवेश शुल्क व परीक्षा शुल्क वाढीचे परिपत्रक मागे घेणे साठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना पंढरपूर यांच्या वतीने निवेदन देत आहोत शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ मधील प्रथम सत्रातील फॉर्म भरणे हे चालू आहे. अशाच सोलापूर विद्यापीठाने परीक्षा फी सोबत अतिरिक्त प्रवेश शुल्क भरावे असे परिपत्रक काढले आहे. यामध्ये विद्यापीठाचे म्हणणे आहे की मागील वर्षी शैक्षणिक शुल्कात सवलत दिली गेली होती मात्र यावर्षी कोरोणाची परिस्थिती सुधारल्यामुळे ही सवलत रद्द करण्यात आले आहे ३० नोव्हेंबर २०२१ रोजी विद्यापीठाने एका परिपत्रकाद्वारे मागील वर्षी दिलेली शैक्षणिक सवलत रद्द करत चालू वर्षापासून पूर्ण फी आकारण्याचे परिपत्रक काढले. एकदा शैक्षणिक वर्ष सुरू झालेनंतर विद्यापीठाने अशा प्रकारे शैक्षणिक म्हणजेच प्रवेश शुल्कात वाढ का केली गेली विद्यापीठाने ३० नोव्हेंबरला परिपत्रक काढले त्यानंतर राज्य सरकारने १५ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालय व विद्यापीठ बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता यामध्ये ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची व सेवा सुद्धा बंदच आहे त्यामुळे गरीब कष्टकरी कुटुंबातील विद्यार्थी शिक्षणा बाहेर फेकले जात जातील पालकाच्या डोक्यावर आर्थिक ओझे वाढवण्याचे काम विद्यापीठ प्रशासन व कुलगुरू करीत आहे त्यामुळे विद्यापीठाने शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर प्रवेश शुल्कात केलेली वाढ चुकीचे असून ती वाढ त्वरित मागे घ्यावी या विद्यार्थ्यांनी प्रवेश शुल्क भरले आहे अशा विद्यार्थ्यांना ते प्रवेश शुल्क परत माघारी देणे यावे कोरणा काळ एस टी महामंडळ संप सध्याच्या शासनाचे धोरण या अनेक कारणांमुळे विद्यार्थी विद्यापीठात येऊ शकले नाही किंवा महाविद्यालयात येऊ शकले नाही त्या विद्यार्थ्यांना पुस्तकासाठी विद्यापीठाने व महामंडळाने दंड कारल्या असल्यास त्याची रक्कम विद्यार्थ्यांना परत करण्यात यावी अशा या विद्यापीठ निर्णयाचा जाहीर निषेध करून विद्यापीठाने दिनांक ११/०२/२०२२ पर्यंत परीक्षा फी वाढीव शुल्क परिपत्र मागे न घेतल्यास दिनांक १४/०२/२०२२ रोजी लोकशाही पद्धतीने कोविड-१९ तिचे सर्व नियम पाळून पंढरपूर तहसीलदार कार्यालयासमोर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या वतीने तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर उपाध्यक्ष अवधूत गडकरी यांनी दिला या वेळी मनविसे चे शहराध्यक्ष प्रताप भोसले,शहर संघटक शैलेश धट, राकेश म्हमाने,प्रसिद्ध प्रमुख तेजस गांजाळे,उपाध्यक्ष रोहन पंढरपूरकर, व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
