धवलसिंहाचे कट्टर समर्थक रघुनाथ साठे यांना लवकरच मिळणार मोठी जबाबदारी
प्रतिनिधी : अकलूज : काँग्रेस (आय)पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मार्गदर्शक डॉ धवलसिंह मोहिते पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळख असलेले महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे मागासवर्गीय आघाडीचे माळशिरस तालुका अध्यक्ष रघुनाथ साठे यांना लवकरच काँग्रेस पक्षामध्ये पदाधिकारी निवडीच्या प्रक्रियेत मोठी जबाबदारी देऊन काम करण्याची संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.
रघुनाथ साठे हे धवलसिंह मोहिते पाटील यांचे खंदे सर्मथक असून जनसेवा संघटनेच्या माध्यमातून त्यांनी सर्वसामान्य जनतेच्या मनात घर केले असल्याचे पाहायला मिळते आहे,त्यांनी धवलसिंह मोहिते पाटील यांच्या पाठीमागे युवकांची फळी मोठया प्रमाणावर उभा करून धवलसिंह यांचा गट माळशिरस तालुक्यात प्रभावी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केला आहे,त्यामुळे धवलसिंह यांच्याशी एकनिष्ठ राहिल्याने रघुनाथ साठे यांना काँग्रेस पक्षामध्ये मोठ्या पदावर काम करण्याची संधी दिली जाऊ शकते अशी चर्चा माळशिरस तालुक्यातील धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कट्टर समर्थक कार्यकर्त्यांमध्ये व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरू आहे.डॉ धवलसिंह यांच्याबरोबर काम करीत असताना रघुनाथ साठे यांनी कोणत्याही प्रकारच्या प्रसंगाची अडचणीची तमा न बाळगता एकनिष्ठतेने काम केल्याने त्यांची नव्याने होणाऱ्या पदाधिकारी निवडणीच्या कार्यक्रमात त्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.त्यामुळे रघुनाथ साठे यांच्या सहकाऱ्यामध्ये उत्साह निर्माण झाला असल्याचे पाहायला मिळत आहे,नक्की रघुनाथ साठे यांना कोणती जबाबदारी दिली जातेय हे पाहणे आवश्यक आहे.
