महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून सर्व शाळांकडून विद्यार्थ्यांवर होणारा अन्यायाबाबत निवेदन
प्रतिनिधी : पंढरपूर : आज महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून व मनसे नेते मा.दिलीप बापु धोत्रे आणि मनविसे चे सोलापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष मा.विजय रोकडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर शहरातील सर्व शाळांना निवेदन देण्यात आले कि, महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने जो आदेश काढण्यात आला आहे कि १५ फेब्रुवारी पर्यंत इयत्ता १ ते ९ पर्यंतच्या सर्व शाळा बंद असतील. तरी काही शाळांनी शाळे बाहेर फलक लावले आहेत कि विद्यार्थ्यांची संपूर्ण फी भरल्याशिवाय आॅनलाईन क्लासेस ला बसू दिले जाणार नाही.तरी काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी कडे तक्रार केली की महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाने असा कोणताही आदेश काढला नाही कि संपूर्ण फी भरल्याशिवाय आॅनलाईन क्लासेस बसू देऊ नका म्हणून, तरी ह्या शाळेची जी मनमानी कोठेतरी थांबवण्यात यावी व सर्व विद्यार्थ्यांना ऑनलाईन क्लासेस ला बसू द्यावे, फी मुळे विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवू नये असे निवेदन महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून देण्यात आले यावेळी मनविसे चे शहराध्यक्ष प्रताप भोसले, मनविसे पंढरपूर शहर उपाध्यक्ष अवधुत गडकरी, राकेश म्हमाणे,सुधर्म मानगावे, रोहन पंढरपुरकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते..
