माळशिरस तालुक्यातील सर्वच पक्षातील नेत्यांचा स्वपक्षावर विश्वास कमी आणि आघाडीवर जादा……

माळशिरस तालुक्यातील सर्वच
पक्षातील नेत्यांचा स्वपक्षावर विश्वास कमी आणि आघाडीवर जादा……

तालुक्यातील नेते नगरपंचायती मध्ये पक्षांची चिन्ह चालवणार का त्यांना शिंगणापूरचा घाट दाखवणार ?

सोलापूर प्रतिनिधी
माळशिरस तालुक्यातील म्हाळुंग, माळशिरस, नातेपुते या नगरपंचायतीच्या निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत परंतु भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, तसेच इतर पक्षातील व संघटनेतील अनेक इच्छुक आहेत परंतु आपल्या स्वतःच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवून पक्ष व पक्षाचे चिन्ह मतदारांपर्यंत पोचवणार का हा प्रश्न सर्वसामान्यांमध्ये निर्माण झालेला आहे जवळ जवळ सर्वच पक्षातील इच्छुकांची मतदारांचे समीकरण जुळवण्यासाठी एकमेकांच्या गाठीभेटी चालू आहेत राज्यामध्ये भाजपा आणि महा विकास आघाडी एकमेकाच्या विरोधात कट्टरतेने काम करताना दिसते परंतु माळशिरस तालुक्यातील नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये हा सर्व गिचमीड काला पाहायला मिळणार असल्याचेही बोलले जात आहे या निवडणुकांमध्ये सगेसोयरे हा फॉर्मुला जास्तीत जास्त चालण्याची शक्यता आहे त्यामुळे कोणत्याच पक्षाला या ठिकाणी किंमत मिळेल का ? हीच शक्यता उमेदवारांना नाही.अनेकजण निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत मात्र पक्षाच्या चिन्हावर लढविणार की आघाडी करून लढविणार हेच गुलदस्त्यात असल्याने इच्छुक उमेदवारांची तारांबळ उडाली आहे,तसेच अनेक ठिकाणी पक्षातील गतटत मिटत नसल्याने पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकारी यांची डोके दुखी वाढली आहे,त्यामुळे माळशिरस तालुक्यातील तिन्ही नगरपंचायत च्या निवडणुकीत कोणता पक्ष चिन्हावर निवडणूक लढविणार हे पाहणे महत्वाचे झाले आहे,तर काही पक्ष निवडणूक लढविणार का नाही यासंदर्भात ब्र शब्द काढताना दिसत नाही,इतरवेळी मोठ्या बढाया मारणारे काही पक्षाचे नेते मूग गिळून गप्प बसल्याचे दिसत आहेत.एकंदरीत या निवडणुकीत पक्ष स्वतःचे अस्तित्व दाखवणार की आघाडी करून लढणार हे पाहणे औत्सुक्याचे झाले आहे. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांचा स्वपक्षावर विश्वास कमी आणि आघाडीवर जास्त विश्वास आहे का ? किंवा तालुक्यातील नेते नगरपंचायत च्या निवडणुकीत पक्षाच्या चिन्हाला शिंगणापूरचा घाट दाखविणार का ? या चर्चेने तालुक्यातील तिन्ही नगरपंचायत मधील जनतेमध्ये जोर धरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom