छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांच्याशी केल्याने भाजपने माफी मागावी—राष्ट्रवादी काँग्रेस

प्रतिनिधी—छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी नरेंद्र मोदी यांची तुलना करणाऱ्या गोयल व त्या पुस्तकाचे समर्थन करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या माजी आमदार व पक्षाच्या पदाधिकारी यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी उपविभागीय अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना निवेदन देऊन निषेध नोंदवला आहे.

यावेळी जिल्हा सरचिटणीस किरण साठे जि प सदस्य बाळासाहेब धाइंजे,माळशिरस तालुकाध्यक्ष माणिक वाघमोडे,युवक जिल्हा सरचिटणीस पिनू येडगे,युवक तालुकाध्यक्ष बाबा जाधव,सोमनाथ शेळके,बंडू कांबळे,शब्बीर शेख,रफिक मुलाणी,उदय कांबळे,सचिन मोरे इत्यादी उपस्थित होते.

अखंड देशाचे व महाराष्ट्र राज्याचे दैवत व अस्मिता असलेले छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदी यांच्या बरोबर करणारे गोयल यांचा व त्या पुस्तकाचे समर्थन करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या माजी आमदार व पदाधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात येत आहे,छत्रपती शिवाजी महाराज यांची तुलना देशामध्ये कुणाशीही करता येत नाही, मात्र ज्या सडक्या मेंदूच्या गोयल नावाच्या व्यक्तीने आज का शिवाजी नरेंद्र मोदी असे पुस्तक लिहून केली आहे,हे कृत्य निंदनीय असून महाराष्ट्र राज्यातील काही भाजपचे माजी आमदार व जबाबदार व्यक्तीनि ही केलेली तुलना बरोबर असल्याची भावना व्यक्त केल्याचे दिसून येत आहे,

खर तर भाजपची केंद्रात सत्ता आल्यापासून भाजपचे लोक मस्तवालपणाने वगात असल्याचे दिसून आले आहेत,ज्या लोकांना वाटत की शिवाजी महाराजांची तुलना ही नरेंद्र मोदी यांच्याबरोबर होऊ शकते त्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कोणत्याही प्रकारची आस्था व प्रेम किंवा अभिमान आहे असे मला वाटत नाही,कारण ज्यांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम,आस्था,किंवा अभिमान असता तर हे अशा प्रकारची विधाने त्यांनी केलीच नसती,मात्र आपलं नाव नरेंद्र मोदी यांच्या पर्यंत पोहचावे या उद्देशाने या पुस्तकाचे समर्थन करताना अनेकजण दिसत आहेत,आशा सडक्या मेंदूच्या व शिवाजी महाराज यांच्याबद्दल प्रेम आदर नसणाऱ्या व्यक्तीला या राज्यांमध्ये राहण्याचा अधिकार नाही, त्याचप्रमाणे सर्वसामान्य जनतेने व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती प्रेम व आदर असणाऱ्या जनतेने बेताल वक्तव्य करणाऱ्यांना लक्षात ठेवले पाहिजे.आणि ज्या लोकांनी या पुस्तकाचे समर्थन केले आहे, आशा लोकांना माफी मागितल्याशिवाय महाराष्ट्र राज्यामध्ये फिरू दिले नाही पाहिजे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांची नरेंद्र मोदी यांच्या बरोबर तुलना करणाऱ्या गोयल याचा व त्या पुस्तकाचे समर्थन करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील भाजपच्या माजी आमदार व पक्षाच्या पदाधिकारी यांचा जाहीर निषेध करण्यात येत असून सदर पुस्तकाचे प्रकाशन भाजपच्या कार्यालयामध्ये झाल्याने भाजप ने जाहीर माफी मागितली पाहिजे,असे निवेदनात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom