अजित पवार यांच्यावर कारवाई करा म्हणण्याचा नैतिक अधिकार मोहिते पाटील यांना नाही—किरण साठे
प्रतिनिधी—अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी करण्याचा अधिकार मोहिते पाटील कुटुंबीयांनी लोकसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर व पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अकलूजमध्ये घेतलेल्या सभेच्या व्यासपीठावर माजी खासदार विजसिंह मोहिते पाटील यांनी हजेरी लावली त्याच क्षणी त्यांनी व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी तो नैतिक अधिकार गमावला आहे,याचे भान त्यांनी ठेवावे,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केली आहे.
बहुतेक मोहिते पाटील कुटूंब विसरले आहेत की त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हा विजयसिंह मोहिते पाटील व त्यांचे कुटुंब कोणत्या पक्षामध्ये होते,? त्याच्या आगोदर मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे,राहिला विषय अजित पवार यांच्यावर कारवाई करण्याचा तो विषय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांतर्गत आहे तो पक्ष ठरवेल पक्षाने काय करावे व काय करू नये हा सल्ला मोहिते पाटील यांनी देऊ नये असा उलट प्रश्नही किरण साठे यांनी विचारला आहे.
मात्र आपण भाजपवशी झाला आहात हे स्वतःला तरी माहित आहे की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे,त्यामुळे आपण भाजपमध्ये प्रवेश केला असताना आपल्या कुटूंबातील व समर्थक जि प सदस्य राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य म्हणून कोणत्या नैतिकतेने काम करीत होते,
आपण भाजपमध्ये प्रवेश केल्यावर आपल्या कुटुंबातील सदस्यांनी व समर्थक सदस्यांनी राजीनामा देने गरजेचे होते, मात्र आपल्या समर्थक सदस्यांनी राजीनामा दिले नाहीत,
आणि जिल्हा परिषद अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी आपल्या समर्थक सदस्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरोधात मतदान केले,त्याच क्षणी त्या सदस्यांवर कारवाई होणार हे निश्चित झाले होते,मात्र त्यांच्यावर फक्त निलंबनाची कारवाई करून चालणार नव्हते म्हणून त्याचे सदस्यत्व रद्द करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले आहे.
आपण स्वतः भाजपमध्ये असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांवर कारवाई केल्याने आपल्या पोटात दुखण्याचे कारणच नाही,त्यामुळे अजित पवार यांच्यावर कारवाई करा म्हणण्याचा नैतिक अधिकार मोहिते पाटील यांना नाही अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी केला आहे.