लक्षवेधी सेनेचे गटशिक्षणाधिकारी यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन
प्रतिनिधी : माळशिरस : दिनांक २३ रोजी माळशिरस तालुक्यातील बोंडले जिल्हा परिषद केंद्रातील खळवे ,बोंडले ,जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक आवताडे व मुख्याध्यापक कवडे कामात कसूर करीत आहेत नियम धाब्यावर बसवून नोकरी करत आहेत लक्षवेधी सेनेच्या तक्रारी नुसार दोन्ही मुख्याध्यापकांनी कामात कसूर केला आहे दिशाभुल ,करणारी माहिती खोटी माहिती, चुकीची माहिती आपल्या लेखी खुलाशात नमुद केलेल्या आहेत परंतु गटशिक्षणाधिकारी अधिकारी माळशिरस यांच्यावर संघटना व तालुक्यातील राजकीय नेते मंडळी यांच्या कडून दबाव आणला जात असण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे आवताडे व मुख्याध्यापक कवडे
यांच्या वर कारवाई करण्यास विलंब होत असल्याचे चित्र दिसून येत आहे
परंतु शिक्षण विभागाला अशा नियम बाह्य व कामात कसूर करीत नेतेगिरी करणाऱ्या मुख्याध्यापक आवताडे व मुख्याध्यापक कवडे यांच्या कारवाई करण्या इतपत कागदपत्रे पुरावे लक्षवेधी सेने कडे आहेत आमची तक्रार आवताडे व मुख्याध्यापक कवडे यांच्या वरती आहे परंतु गटशिक्षणाधिकारी मा.देशमुख साहेब यांनी दिनांक २९ -९-२०२१ रोजी जिल्हा अधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद सोलापूर येथील कवडे व आवताडे यांच्या वर कारवाई संदर्भात आमरण उपोषण लक्षवेधी सेना करणार आहे त्या दरम्यान गटशिक्षणाधिकारी विस्तार अधिकारी. केंद्र प्रमुख ई नी वस्तूनिष्ठ अहवाल नाही पाठवला तर संबंधित सर्व अधिकार या तक्रारीत वर्ग केले जाणार आहेत अशा इशारा लक्षवेधी सेना संस्थापक अध्यक्ष अनिल साठे लक्षवेधी सेना प्रदेश अध्यक्ष अमित पिराजी भिंगारदिवे यांनी दिला

