वेळापूर पोलीस स्टेशचे कर्मचारी अमोल वाघमोडे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी १३जानेवारीला ठिय्या आंदोलन

वेळापूर पोलीस स्टेशचे कर्मचारी अमोल वाघमोडे यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी १३जानेवारीला ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी—आज२४ तास —वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे यांना त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीचे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी माळशिरस विभाग अकलूज यांना मळोली येथील धनाजी जाधव यांनी निवेदन दिले आहे.
सदर निवेदनात नमूद केले आहे की, दिनांक ८/१/२०२० रोजी १२.४५ ते १.३० वाजण्याच्या सुमारास मी वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये माझ्या मित्राबरोबर गेलो होतो,त्याठिकाणी कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे यांनी मला विनाकारण बहीण चोत,शेट्या उपट्या,व अनेक शिव्या दिल्या आहेत, मी अमोल वाघमोडे या पोलीस कर्मचाऱ्यांला काहीही केलेले नसताना मला त्यांनी शिवी गाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली असल्याचे धनाजी जाधव यांनी निवेदनात म्हटले आहे,तसेच मी पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे यांच्यावर कारवाई करावी म्हणून आंदोलनाला बसणार आहे, त्यामुळे माझ्यावर वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करणयाची शक्यता नाकारता येत नाही,म्हणून आपण वेळापूर पोलीस स्टेशनमध्ये वरील वेळेमधील सी सी टी व्ही फुटेज तपासावे व त्यामध्ये मी कुठेही शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचे दिसून आल्यास माझ्यावर तो गुन्हा दाखल करावा,अशीही मागणी केली आहे,मात्र मी पोलीस कर्मचारी अमोल वाघमोडे यांच्या विरोधात आपल्या कार्यलयासमोर आंदोलनाला बसल्या कारणाने माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केल्यास मी आत्महत्या करणार असल्याचाही इशारा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांना दिलेल्या निवेदनात धनाजी जाधव यांनी दिला आहे,तरी मला विनाकारण शिवीगाळ व मानसिक त्रास देणाऱ्या व शिवीगाळ करणाऱ्या अमोल वाघमोडे या पोलीस कर्मचाऱ्यांला त्वरित निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी उपविभागीय पोलीस अधिकारी अकलूज यांच्या कार्यालयासमोर दिनांक १३/१/२०२० रोजी बेमुदत ठिय्या आंदोलन करणार असल्याचा इशारा धनाजी जाधव यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom