माळेवाडी (अकलूज) रस्त्यावरील स्पीड ब्रेकर दुरुस्त न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार –सुदाम आवारे

माळेवाडी (अकलूज) रस्त्यावरील स्पीड ब्रेकर दुरुस्त न केल्यास मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन करणार –सुदाम आवारे

प्रतिनिधी-अकलूज -मनसे राज्य सरचिटणीस दिलीप धोत्रे,माढा लोकसभा अध्यक्ष आप्पासाहेब कर्चे,तालुका अध्यक्ष सुरेश टेळे यांच्या मार्गदर्शनाखाली सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना मनसेच्या वतीने माळेवाडी(अ) येथील स्पीड ब्रेकर दुरुस्ती करण्यासंदर्भात शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी निवेदन दिले आहे.यावेळी जिल्हा सरचिटणीस आकाश होनमाणे उपस्थित होते.

आपल्या बांधकाम विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या अकलूज ते वेळापूर या रस्त्यावर माळेवाडी (अ)येथील शाळेसमोर मोठया प्रमाणावर खड्डा पडला असून त्यावर चढ निर्माण झाला आहे,त्यामुळे या रस्त्यावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना नाहक त्रास होत आहे,तसेच वाहनधारकांना त्यांच्या वाहनाच्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे तरी आपण तात्काळ तो स्पीड ब्रेकर दुरुस्ती करावी अन्यथा आपल्या कार्यालयासमोर येत्या आठ दिवसांत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसेचे अकलूज शहराध्यक्ष सुदाम आवारे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom