भाजपचे तालुका अध्यक्ष व धर्मपुरी गावचे सरपंच यांच्यावर आपत्रतेची कारवाई करण्याचे विभागीय आयुक्त यांना निवेदन

भाजपचे तालुका अध्यक्ष व धर्मपुरी गावचे सरपंच यांच्यावर आपत्रतेची कारवाई करण्याचे विभागीय आयुक्त यांना निवेदन

बहुजन ब्रिगेडचा ३० जून ला आंदोलनाचा करण्याचा इशारा

प्रतिनिधी—-पुणे विभागीय आयुक्त यांना बहुजन ब्रिगेड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष किरण साठे यांच्या मार्गदर्शनाखाली बहुजन ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी निवेदन देऊन मौजे धर्मपुरी ता.माळशिरस येथील भारतीय जनता पक्षाचे माळशिरस तालुका अध्यक्ष व धर्मपुरी गावचे विद्यमान सरपंच बाजीराव काटकर यांच्या वर कारवाई करण्यासंदर्भात मुख्यकार्यकारी अधिकारी सोलापूर जिल्हा परिषद यांनी दिनांक १०/६/२०२१ रोजीच्या दिलेल्या अहवालावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करण्यात आली असून तात्काळ कारवाई न केल्यास संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.यावेळी युवा सेना माळशिरस तालुका समन्वयक विजयकुमार रुपनवर,पुणे शहराध्यक्ष गणेश मिसाळ,पुणे जिल्हा संघटक अविराज माने उपस्थित होते.

माळशिरस तालुक्यातील मौजे धर्मपुरी ग्रामपंचायत मध्ये १४ व वित्त आयोग अंतर्गत साहित्य खरेदीमध्ये झालेल्या अनियमितते संदर्भात धर्मपुरी गावच्या सरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार अपात्रतेची कारवाई करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी श्री दिलीप स्वामी यांनी दिनांक १०/०६/२०२१ रोजी आपल्या कार्यालयात अहवाल सादर केला आहे,त्यावर तात्काळ कारवाई न केल्यास आपल्या कार्यलयासमोर येत्या ३० जून रोजी पासून शासकीय वेळेत तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करण्यात येईल असा इशारा बहुजन ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष दत्ता कर्चे यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

taraftarium24taraftarium24taraftarium24taraftarium24canlı maç izlecanlı maç izlecanlı maç izlecanlı maç izleselçuk sportsselçuk sportsselçuk sportsselçuk sportstoptan kozmetikkozmetik depom